Sambhajinagar Crime : वेबसीरीज बघून आखला भयंकर कट; २० मिनिटांत २० लाखांचा मुद्देमाल गायब, ३ जिल्ह्यांचं कनेक्शन उघड

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या या चोरीची घटनेच्या महिनाभरानंतर मिळालेल्या माहितीवरून या चोरी करणाऱ्या तिघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुलढाणा, परभणी आणि सिल्लोड येथून अटक केली.
Sambhajinagar Crime
Sambhajinagar CrimeSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील एन ११ परिसरामध्ये असणाऱ्या समर्थ ज्वेलर्स हे दुकान (Sambhajinagar) महिनाभरापूर्वी चोरट्यांनी फोडले होते. त्यातून (Theft) चोरट्यांनी जवळपास २० लाखांचे दागिने लंपास केले होते. चोरट्यांनी चोरीचा हा डाव वेब सिरीज पाहून केल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Sambhajinagar Crime
Beed Accident: लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची अपघाती मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना

छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या या चोरीची घटनेच्या महिनाभरानंतर मिळालेल्या माहितीवरून या चोरी करणाऱ्या तिघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Buldhana) बुलढाणा, परभणी आणि सिल्लोड येथून अटक केली. २ मार्चला या तिघांनी संभाजीनगरतील समर्थ ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून तब्बल ३१ किलो चांदी आणि १२ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. मात्र चोरी करण्यापूर्वी त्यांनी दुकानासमोरील (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरा फोडला होता आणि त्यानंतर हायड्रोलिक पकडीच्या सहाय्याने हे कुलूप तोडले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar Crime
Beed News : कोरड्या विहिरीच्या खडकावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

चांदीचे दागिने जप्त 

घटनेनंतर पोलिसात (Police) तक्रार देण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून तपास सुरु होता. या तपासादरम्यान पोलिसांनी चोरट्याना ताब्यात घेतले आहे. गुरुमुखसिंग हिरासिंग टाक, हरिंदरसिंग सागरसिंग दुधानी आणि मोहित भिकुलाल भंडारी अशी ताब्यात घेतलेल्या ३ आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ८९ हजार रुपयाचे चांदीचे दागिने जप्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com