Beed News : कोरड्या विहिरीच्या खडकावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Beed Latest news : बीडमधून दुर्देवी घटना समोर आली आहे. बीडमध्ये शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीतील खडकावर पडून जागीच मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात उमरी गावात ही दु:खद घटना घडली आहे.
Beed news
Beed newssaam tv

Beed latest News :

बीडमधून दुर्देवी घटना समोर आली आहे. बीडमध्ये शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीतील खडकावर पडून जागीच मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात उमरी गावात ही दु:खद घटना घडली आहे. सिध्देश्वर सखाराम घायतिडक असं ५५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. (Latest Marathi News)

शेतकऱ्याच्या मृत्यू कसा झाला?

शेतकरी सिद्धेश्वर धायतिडक हे त्यांच्या स्वत:च्या शेतातील आखाड्यावर जनावरे रोखण्यासाथी मुक्कामी थांबले होते. ते रात्री झोपेतून उठले, विहिरीच्या दिशेने निघाले. विहिरीजवळ गेले, तिकडे गेल्यावर त्यांना अंदाज आला नाही. त्यानंतर ते कोरड्या विहिरीत खडकावर पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला व नाकाला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Beed news
Praniti Shinde News : भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

या दुर्घटनेनंतर वडील कसे घरी आले नाहीत हे पाहण्यासाठी मुलगा शेतात गेला. त्यावेळी ही घटना त्याच्या निदर्शनास आळी. शेतकरी सिद्धेश्वर यांच्या पश्चात पत्नी, सहा मुली, एक मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed news
Navneet Rana : मला लहान म्हणून सांभाळून घ्या, नवनीत राणांचं भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना आवाहन

साताऱ्यात जलायशात बुडून दोघांचा मृत्यू

साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील कोयना जलाशयात वाळणे गावात दुर्दैवी घटना घडली. रविवारी कोयना जलाशयात 12 ते 13 व्या गटातील चार मुली पोहायला गेल्या असताना पाण्यात बुडाल्या.

घटनास्थळी आरडाओरडा झाल्यानंतर गावकऱ्यांनी पोहताना बुडालेल्या चारही मुलींना बाहेर काढले. यामध्ये दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन जणांना वाचवण्यात यश आलं. एक जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com