Praniti Shinde News : भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

Praniti Shinde On BJP : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात प्रणिती शिंदेंनी सभा घेण्यास सुरूवात केली आहे. सोलापुरात रविवारी रात्री सभा पार पडली.
Praniti Shinde News
Praniti Shinde NewsSaam TV

विश्वभूषण लिमये

Political News :

भाजपच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागे गेलाय. तर आपला देश 50 वर्ष मागे गेला आहे. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लागली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Praniti Shinde News
Jayant Patil On BJP Mission 45 Plus : महायुतीचे उमेदवार ठरण्यापूर्वीच काेल्हापूर, सातारा लाेकसभा मतदरासंघात जयंत पाटलांचा विजयाचा दावा

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सरू आहे. यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात प्रणिती शिंदेंनी सभा घेण्यास सुरूवात केली आहे. सोलापुरात रविवारी रात्री सभा पार पडली. या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना प्रणिती शिंदेंनी सरकारवर जहरी टीकास्त्र सोडलं आहे.

"समोरून उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं?, भाजपच्या कामांचा पाढा वाचत प्रणिती शिंदेंनी असा सवाल उपस्थित केला आहे.

"हाथी के दांत दिखाणे के एक और खाणे के एक" यांच्या विचारसरणीमुळे आपला देश 50 वर्ष मागे गेलाय. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म-जात करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत. आधी आपण असे नव्हतो, निवडणूकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करत आहेत, असा आरोपही प्रणिती शिंदेंनी भाजपवर केला आहे.

ज्या दिवशी असं व्हायला लागेल त्यादिवशी लोकशाहीला खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा,ते फक्त गाजर दाखवत आहेत. मी एकमेव आहे जी विधानसभेत भाजप विरोधात बोलते. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या,मग बाकी ते टेन्शन माझं, अशा विश्वास प्रणिती शिंदेंनी उपस्थितांसमोर व्यक्त केलाय.

Praniti Shinde News
Maharashtra Politics: उमदेवारी जाहीर होताच निलेश लंकेंची खलबतं; मध्यरात्री घेतली बाळासाहेब थोरातांची भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com