सचिन बनसोडे साम टीव्ही, शिर्डी
राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके हे थेट संगमनेरमध्ये विखे पाटलांचे राजकीय विरोधक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Nilesh Lanke Meet Balasaheb Thorat) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. (latest politics news)
संगमनेर शहरातील सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंके यांची भेट झाली (Ahmednagar Lok Sabha Election 2024) आहे. निलेश लंके यांनी बाळासाहेब थोरात यांचे आशिर्वाद घेतले आहेत. यानंतर दोघांमध्ये जवळपास दीड तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
निलेश लंकेंची प्रतिक्रिया
राज्यातील सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असलेल्या थोरात साहेबांची आज निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) भेट घेतली आहे. त्यांनी निवडणुकीला सामोरे कसं जायचं, याचं मार्गदर्शन घेतल आहे. विखेंबाबत नगर दक्षिणची जनता निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
निलेश लंके हा छोटा कार्यकर्ता असला तरी फार गुणी आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा हा कार्यकर्ता आहे..नगर दक्षिणची लढाई ही 'श्रीमंत विरुद्ध गरिबी' अशी आहे. यात निलेश लंके विजयी होतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काल (३० मार्च) लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी या उमेदवारांची घोषणा केलीय. त्यांच्याकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात (Maharashtra Politics) आलीय.
नगर दक्षिणमधून अजित पवार गटातून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश लंके आता तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली ( Lok Sabha Election 2024) आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.