Amravati Lok Sabha: नवनीत राणा ३ लाख मतांनी पराभूत होणार, महाविकास आघाडीच्या नेत्याचा दावा

Amravati Lok Sabha Constituency MVA Candidate: अमरावती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आहेत. ते आज त्यांचा नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
Amravati Lok Sabha Constituency MVA Candidate
Amravati Lok Sabha Constituency MVA CandidateSaam Tv

अमर घटारे साम टीव्ही, अमरावती

Maharashtra Lok Sabha Election 2024

अमरावती (Amravati) लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. बळवंत वानखडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. आज अमरावतीमध्ये (Amravati Breaking) महाविकास आघाडी जोरदार शक्तीप्रदर्शन करणा आहे. (latest politics news)

मला कोणत्याही उमेदवारांचे आव्हान नसणार. माझा विजय हा एकतर्फी राहील, असा विश्वास बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला आहे. खासदार नवनीत राणा तीन लाख मतांनी विजयी (Maharashtra Lok Sabha Election 2024) नाही, तर पराभूत होतील असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील वातावरण तापलेलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीची काय ताकद आहे, हे आज विरोधकांना दाखवून देऊ असंही बळवंत वानखेडे यांनी म्हटलं आहे. आज अमरावतीत महाविकास आघाडी वतीने नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढली काढणार ( Lok Sabha Election 2024) आहे. आज अमरावतीत महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade Campaign) यांनी २६ मार्च रोजी प्रचाराचा नारळ फोडून थेट विजयासाठी अंबादेवीला साकडं घातलं आहे.

Amravati Lok Sabha Constituency MVA Candidate
Satara Politics : अजित पवार गटातील नेता शरद पवारांच्या भेटीला; निवडणुकीआधी साताऱ्यातील राजकीय समीकरणं बदलणार?

महाविकास आघाडीच्या वतीने अमरावती लोकसभेसाठी काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यांनी अमरावतीचे आराध्य दैवत अंबादेवी आणि एकवीरा देवीची महाआरती करून प्रचार (Amravati Lok Sabha Constituency) सुरू केलाय.

Amravati Lok Sabha Constituency MVA Candidate
Nashik Politics : छगन भुजबळांना नाशिकमधून लोकसभा उमेदवारी जवळपास निश्चित; पुढील ४८ तासात निर्णय होणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com