Amravati Politics: अमरावतीत माविआचं जोरदार शक्तिप्रदर्शन; बळवंत वानखडेंच्या विजयासाठी थेट अंबादेवीला साकडं

MVA Balwant Wankhade Campaign Amravati: राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात आहे.
MVA Balwant Wankhade Campaign Amravati
MVA Balwant Wankhade Campaign AmravatiSaam Tv

Maharashtra Politics Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून (MVA) जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार बळवंत वानखडे (Balwant Wankhade Campaign) यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ थेट अंबादेवीला साकडे घालून फोडला आहे. त्यांनी अमरावतीचे आराध्य दैवत अंबादेवी व एकवीरा देवीची ओटी भरून आणि महाआरती करून प्रचार सुरू केला आहे. (latest politics news)

अमरावतीमध्ये (Amravati Politics) बळवंत वानखडे यांनी विजयाकरिता अंबादेवीला साकडे घातले आहे. माझ्या विरोधात कोणी उभे राहणार नाही. याची अंबामाता काळजी घेईल , असं बळवंत वानखडे म्हणाले आहेत. आजपासून महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उमेदवार बळवंत वानखडे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या विजयासाठी सर्वांनी साकडं घातलं आहे, तर दुसरीकडे माझ्याविरोधात महायुतीला उमेदवार मिळत नाही (Maharashtra Politics) आहे. माझ्या विरोधात अजूनही उमेदवारMVA Balwant Wankhade Campaign Amravati: राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात आहे.

नाही ही अंबादेवीचीच कृपा आहे, असा टोला वानखडे यांनी लगावला आहे. तर यावेळी यशोमती ठाकुर, शिवसेनेचे माजी खासदार अंनत गुढे, माजी मंत्री सुनील देशमुख यांसह महाविकास आघाडीचे सर्वच नेते यावेळी उपस्थित होते. राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. बळवंत वानखडेंच्या विजयाकरिता थेट अंबादेवीला साकडे घालण्यात (Maharashtra Politics Lok Sabha Election 2024) आलं आहे.

MVA Balwant Wankhade Campaign Amravati
Maharashtra Politics: महायुतीचं घोडं २ जागांवर अडलं; ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून रस्सीखेच सुरूच

महाविकास आघाडीच्या वतीने अमरावती लोकसभेसाठी दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी (Lok Sabha Election 2024) ही उमेदवारी शिवसेनेच्या उमेदवाराला द्यावी, असं आग्रही मत शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं होतं.

MVA Balwant Wankhade Campaign Amravati
Maharashtra Politics: पंकजा मुंडेंना दिल्लीचं तिकीट, प्रीतम मुंडेंच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू; आमदारकीसाठी मतदारसंघ ठरला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com