Loksabha Election: शिवतीर्थावर धडाडणार प्रचाराच्या तोफा! शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी 'राजकीय' रस्सीखेच; पालिकेकडे अर्ज दाखल

Maharashtra Politics News: निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSAAM TV

गिरीश कांबळे, मुंबई|ता. २६ मार्च २०२४

Loksabha Election 2024:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असून एप्रिल आणि मे महीन्यात प्रचारसेभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणुन पालिकेकडे राजकीय पक्षांचे अर्ज यायला सुरूवात झाली आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

शिवाजी पार्कवर प्रचारांचा धडाका..

याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. एप्रिल आणि मे महीन्यात प्रचारसेभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे पालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी १६ , १९ , २१ एप्रिल सभा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणुन शिवसेना शिंदे गटाने अर्ज केला आहे.

परवानगीसाठी अर्ज दाखल!

तसेच ३ मे, ५ मे, ७ मेलाही निवडणुक प्रचारासाठी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी शिंदे गटाने मागितली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुद्धा २२, २४, २७ एप्रिल रोजी प्रचार सभेला मैदान मिळावे म्हणुन अर्ज करण्यात आला आहे. तर भारतीय जनता पक्षाने (BJP) २३, २६, २८ एप्रिलला शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी अर्ज दाखल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Political News
Udayanraje Bhosale : सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंची जोरदार फिल्डिंग; "आरंभ है प्रचंड" लिहिलेलं पोस्टर चर्चेत

मनसे- ठाकरे गटात संघर्ष?

दरम्यान, शिवाजी पार्कवरील सभेवरुन मनसे- ठाकरे गटात संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेसाठी १७ मे रोजी मैदान मिळावे म्हणून अर्ज करण्यात आला आहे. त्याचदिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा मैदान मिळावे म्हणुन पालिकेला अर्ज करण्यात आला आहे. सोबतच शिंदे गटाने १२ ऑक्टोंबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठीही अर्ज करुन ठेवला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Political News
Nashik Water Cut : नाशिककरांनो पाणी जपून वापरा, सलग दाेन दिवस 12 प्रभागात पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com