मयुर राणे
राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं आहे. संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागा वाटपावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी आमचं जागावाटप महाराष्ट्रात होतं. दिल्लीची गुलामी करावी लागत नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. (latest politics news)
काँग्रेसने महाराष्ट्रातील बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची यादी दिल्लीतून जाहीर होते, असं संजय राऊत म्हणाले. काल शरद पवार आणि जयंत पाटील हे मातोश्रीवर आले (Maharashtra Politics) होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. प्रचाराची रणनीती ठरविण्यासंदर्भात ही बैठक झाली. पवार साहेबांसोबत नेहमी सकारात्मक चर्चा होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेची पहिली यादी तयार आहे. दिवसभरात ती यादी आम्ही प्रसिद्धीला देऊ. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक (Maharashtra Lok Sabha Election 2024) आहे. महाविकास आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकरांना चार जागांचा दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
संविधान वाचविण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासोबत राहतील, असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा, संघर्ष आणि त्यांचं संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहीत (Maharashtra Lok Sabha) आहे. त्यांच्या परखड वक्तव्यात समाजाचं हित असतं. त्यांच्याशी आम्ही वारंवार संवाद साधून आहोत, असंही राऊत म्हणाले.
शिंदे पवारांच्या हातात काही नाही. दिल्लीचे पवार, भुजबळ यांचे नेते गुजराती नेते आहेत. ते ठरवतील जागा द्यायची की नाही, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला. पूर्वी जागावाटप असेल तर मातोश्रीवर बैठका व्हायच्या. आता यांना दिल्लीत जावं लागतं. पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं.छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं, असंही संजय राऊत म्हणाले (Lok Sabha Election 2024) आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने स्वतः घेतला. आम्हाला दिल्लीत जाण्याची गरज लागली नाही. आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो. आम्हाला दिल्लीची गुलाम करावी लागत (Lok Sabha) नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. मुघलकाळात मंडलिक संस्थानांचे वर्चस्व होतं. ते सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. स्वतः निर्णय घेण्याची कुवत आणि हिम्मत अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये नाही. या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजप नेत्यांकडे जाऊन बसावं लागतं असल्याची टिका राऊतांनी (Sanjay Raut News) केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.