Navneet Rana : मला लहान म्हणून सांभाळून घ्या, नवनीत राणांचं भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना आवाहन

Amravati Politics : नवनीत राणा 4 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.
Navneet Rana
Navneet RanaSaam TV

अमर घटारे | अमरावती

Amravati Politics :

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपने लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला प्रचार देखील सुरु केला. दरम्यान आज त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

मी सगळ्यांना विनंती करते, मला लहान म्हणून सांभाळून घ्या. सगळ्यांनी एकत्र या कुठे चूक झाली तर तुम्ही पुढे राहा, मी मागे राहीन, असं नवनीत राणा यांनी म्हटलं. भाजपाच्या कार्यक्रमात नवनीत राणा बोलत होत्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navneet Rana
Maharashtra Lok Sabha Election : वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर; कोणत्या उमेदवाराला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक लोकांनी साथ सोडली. पण आम्ही महायुती सोबत कायम होतो. सत्ता नसतानाही कायम होतो आणि सत्ता असतानाही कायम आहे आणि पुढे कायम राहील, असा टोलाही नवनीत राणा यांनी लगावला.

अपक्ष असताना मी मोठ्या प्रमाणावर अमरावतीमध्येसाठी निधी आणला. जर कमळाच्या चिन्हावर निवडून गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर अमरावतीच्या विकासासाठी निधी देतील, असं आश्वासन देखील नवनीत राणा यांनी अमरावतीकरांना दिलं.

Navneet Rana
Dhule Lok Sabha: धुळ्यात कोणत्या पक्षाचा निवडून येणार खासदार? युती जिंकणार की, मविआ बाजी मारणार? जाणून घ्या स्थानिक परिस्थिती

नवनीत राणा 4 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नामांकन रॅलीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बुथप्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडेल. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी 7 किंवा 8 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची अमरावतीत प्रचार सभा होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com