‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींच्या आरोपानंतर आणखी चार खुलासे करणार असल्याचा इशारा दिलाय. मराठा समाजात फूट पाडण्याचा आणि आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Manoj Jarange Patil warns of four more revelations after 500 crore claim
Manoj Jarange Patil warns of four more revelations after 500 crore claimsaam tv
Published On: 
Summary
  • ५०० कोटींच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील आणखी चार बॉम्ब टाकणार

  • मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

  • जरांगे पाटील यांच्या नव्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

५०० कोटीच्या बॉम्बनंतर आणखी नवीन ४ बॉम्ब टाकणार असल्याचा इशारा खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मराठ्यांचा एकही बांधव विरोधात बोलत नाही, म्हणून सरकार नवीन टीम बोलावून घेत आहे. मला बदनाम करण्यासाठी त्यात महिला आणि माणसं विकत घेत आहेत. हे समाजाने समजून घ्यावं. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी सरकारकडून महिला आणि लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरूय, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय.

मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र सुरू असून आता लवकरच आणखी चार बॉम्ब टाकणार आहे, अनेकांची नावे उघड करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. "त्यांचं काम आहे आम्हाला शरण यायला लावणं. सरकारला वाटतंय की आम्ही मॅनेज होत नाही, त्यांचं ऐकत नाही. वारंवार आणखी टीम बोलवायची, मराठ्यांच्या विरोधात बोलायला लावायचं. ज्याला ज्याला बोलायला लावत आहेत, त्याला मी राजकीय करिअरमधून शंभर टक्के संपवणार. बोलणारे हे लोक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आहेत.

Manoj Jarange Patil warns of four more revelations after 500 crore claim
अजित पवार गटात नाराजीनाट्य आहे? कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी थेटच सांगितलं

या लोकांना आंदोलनाच्या विरोधात बोलायला लावलं जातंय. सारखी त्यांची ओरड सुरू झाली होती. सध्या मराठ्यांचा एकही बांधवविरोधात बोलत नाही. म्हणून सरकार मला बदनाम करण्यासाठी नवीन टीम बोलावून घेतंय. त्यात महिला आणि माणसं विकत घेत आहेत, हे समाजाने समजून घ्यावं. सरकार आपलेच लोक आपल्या पाठीशी लावत आहे, हे मराठा समाजाने समजून घ्यावं, असा आरोप जरांगेंनी केलाय.

Manoj Jarange Patil warns of four more revelations after 500 crore claim
जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

योग्य वेळी आपण योग्य गोष्ट सांगितली पाहिजे. सध्या पक्षाचं कोणतंही असो, आपल्या हक्काचे दोन-चार मंत्री असले पाहिजेत. त्या समाजाचा मंत्री त्यांना आधार देतो, फोन करतो. आम्हाला कोणत्याच मंत्र्याचा फोन येत नाही. म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात, आमच्या जमिनी बळकावल्या जातात, अधिकाऱ्यांना त्रास होतो, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.