अमित शाहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. शाहांच्या भेटीमुळे पक्षातील अंतर्गत वाद, दुफळीबाबत तर्क वितर्क काढण्यात आलेत. त्यावर सुनील तटकरेंनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिलीय. पक्षात नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर चर्चा झाली. पक्षाची संघटना मजबूत करणे आणि आगामी कामकाजाबाबत बैठकीत विचारविनिमय झाल्याचं त्यांनी सांगितलं.
कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील दुष्काळ स्थिती, त्यासाठी पक्षाकडून कोणती कामे केली पाहिजे. तसेच उद्या होणाऱ्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसंदर्भात चर्चा झालीय. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वात पक्षातील नेते कसे काम करतील. पक्ष संघटनात्मक कस मजबूत करता येईल, त्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे पक्षात कोणत्याच प्रकारची नाराजी नसल्याचं सुनील तटकरे म्हणालेत.
आगामी काळात पक्षाची भूमिका आणि पक्ष वाढीसंदर्भात आजही बैठक होती. पक्षात कुठेही नाराजी नाही दिल्लीतील बैठक ही नियोजित होती.
आजच्या बैठकीत पक्षाचीलभूमिका आणि आगामी वाटचाल आणि पक्ष बांधणी संदर्भात होती. उद्या देखील आम्ही सर्व आमदार यांची बैठक बोलावली आहे. पक्षातील आमदारांची मत जाणून घेण्याबाबत याआधी दादा असताना, तसेच त्या आधीही बैठका होत होत्या.आमचे नेते मध्यंतरी कामानिमित्त व्यस्त असल्याने या बैठका होऊ शकल्या नाहीत.
मात्र कुठेही नियुक्त्यांबाबत नाराजी नाहीये, असं तटकरे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.