mob hits senior citizen asaram donadkar 3 youth arrested in chandrapur Saam Tv
क्राईम

तिहेरी हत्याकांडानंतर नागभीड तालुका पुन्हा हादरला, जादूटाेणाच्या संशयातून वृद्धाची हत्या

mob hits senior citizen asaram donadkar 3 youth arrested in chandrapur : त्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा काल रात्री 8 च्या दरम्यान ही घटना घडल्याने माैशी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

संजय तुमराम

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समाेल आला आहे. आसाराम दोनाडकर (वय 67) असं मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान 3 महिन्यांपूर्वी याच गावात एकाने स्वत:च्या दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा प्रकार घडला हाेता.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. जादूटोणा करतो म्हणून त्यांच्याशी जमावाने वाद घातला. दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील झाली.

ही मारहाण ते बेशुद्ध होईपर्यंत झाली. काहींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली. या प्रकरणी पाेलिसांनी संतोष जयघोष मैंद (वय 26), श्रीकांत जयघोष मैंद (वय 24), रुपेश देशमुख (वय 32) या संशियतांना अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT