Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

Nanded Latest Marathi News : शेवगा लागवडीसाठी त्यांना 55 हजारांचा खर्च आलाय. आता शेवगा शेंग तोडणीला सुरुवात झालीय. शेवग्याला मागणी देखील वाढल्याचे सांगितले जात आहे.
nanded farmer earns lakhs of rs from moringa
nanded farmer earns lakhs of rs from moringaSaam Digital
Published On

- संजय सूर्यवंशी

पारंपरिक शेतीला बगल देत एका शेतकऱ्याने शेवग्याची लागवड केली. शेवगा लागवडीतून या शेतकऱ्याने लाखो रुपये कमावले. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावातील तरुण शेतकरी नंदकुमार गायकवाड असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदकुमार गायकवाडने आपल्या दोन एकर शेती मध्ये शेवगा लागवड केली. लागवडी नंतर शेवग्याचे योग्य नियोजन केले. शेवगा लागवडीसाठी त्यांना 55 हजारांचा खर्च आलाय.आता शेवगा शेंग तोडणीला सुरुवात झालीय. (Maharashtra News)

nanded farmer earns lakhs of rs from moringa
Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

सुरुवातीलाच गायकवाड यांना खर्च वजा करता 2 लाख रुपयांचा नफा झालाय. शेंग तोडणी सुरू असून अजून यातून 3 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याला आहे. पुढील पाच वर्षे या शेवगा लागवडीतून उत्पन्न मिळणार असल्याचे या तरुण शेतकऱ्याने सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

nanded farmer earns lakhs of rs from moringa
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com