Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

विशेष म्हणजे या रॅलीमध्ये ई-बाईकचा तसेच हेल्मेटचा वापर केल्याचे दिसून आले. रॅलीच्या सुरुवातीला मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. रॅलीमध्ये 700 ते 800 दुचाकी वाहनांचा समावेश होता.
voter awareness bike rally held in palghar and satara
voter awareness bike rally held in palghar and sataraSaam Digital

- रुपेश पाटील

Voter Awareness Bike Rally In Palghar:

देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जास्ती जास्त मतदान करावे, आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पालघर आणि सातारा जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सहकार्यातून मतदान जनजागृती बाईक रॅली काढली. या रॅलीत हजाराे जण सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

पालघर शहरात महिलांच्या निघालेल्या या भव्य जनजागृती रॅलीला पालघरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या बाईक रॅलीत फेटे बांधून महिलांकडून नागरिकांची मतदानाबाबत जागृती करण्यात आली.

या रॅलीत पालघर पोलिस दलातील महिला कर्मचार्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी तसेच विविध संघटनाच्या महिलांनी सहभाग नाेंदविला. यावेळी महिलांनी नागरिकांना जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले.

voter awareness bike rally held in palghar and satara
Bhiwandi Constituency : काॅंग्रेसकडून माझी उमेदवारी अंतिम, मध्येच कोणीतरी सुपारी घेऊन बाळ्या मामाचा बळी दिला : निलेश सांबरे

सातारा जिल्ह्यात मतदान जागृती रॅली

सातारा लोकसभा मतदारसंघातील (satara loksabha constituency) मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा स्वीप कक्षा मार्फत जिल्ह्यात बाईक रॅलीचे (sveep voter awareness) आयोजन करण्यात आले होते.

ही रॅली सातारा जिल्हा परिषद मैदानातून पोवई नाका मार्गे मोळाचा वाडा ,वर्ये, नेले, किडगाव, कळंबे, माळ्याची वाडी, साबळेवाडी कोंडवे मार्गे सातारा परत आली. सातारा लाेकसभा मतदारसंघात 7 मे राेजी 100 टक्के मतदान करा अशा पद्धतीच्या फलकांतून जागृती करण्यात आली.

विशेष म्हणजे या रॅलीमध्ये ई-बाईकचा तसेच हेल्मेटचा वापर केल्याचे दिसून आले. रॅलीच्या सुरुवातीला मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. रॅलीमध्ये 700 ते 800 दुचाकी वाहनांचा समावेश होता.

या रॅलीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा परिषद प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह प्रशासकीय प्रमुख अधिकारी बाईकवरुन सहभागी झाले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन निलेश घुले, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमळे, पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मूजावर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्रभावती कोळेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,महिला व बालकल्याण रोहिणी ढवळे, गटविकास अधिकारी पंचायत समिती सतीश बुद्धे, तसेच सातारा जिल्हा परिषद सर्व कर्मचारी पंचायत समिती सर्व कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

voter awareness bike rally held in palghar and satara
Sveep Awareness Program In Kolhapur : काेल्हापुरात 10 हजार 495 विद्यार्थ्यांंकडून मतदार जागृती, नॅशनल रेकॉर्डसह एशिया पॅसिफीक रेकॉर्डची नोंद (video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com