Shruti Vilas Kadam
ब्रेडच्या स्लाइस, अंडी, दूध, साखर, चिमूटभर मीठ, व्हॅनिला इसेन्स आणि बटर किंवा तूप लागेल. आवडीनुसार दालचिनी पावडरही घालू शकता.
एका बाऊलमध्ये अंडी फोडून त्यात दूध, साखर, मीठ आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले फेटून घ्या. मिश्रण एकसारखे झाले पाहिजे.
ब्रेडचा प्रत्येक स्लाइस तयार मिश्रणात दोन्ही बाजूंनी हलकेच बुडवा. जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर ब्रेड तुटू शकतो.Saam tv
तवा गरम करून त्यावर बटर किंवा तूप लावा. त्यावर भिजवलेला ब्रेड स्लाइस ठेवा आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
एक बाजू भाजल्यावर स्लाइस उलटून दुसरी बाजूही छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.
तयार फ्रेंच टोस्टवर मध, मेपल सिरप, पावडर साखर, फळे किंवा ड्रायफ्रूट्स घालून सजवा.
फ्रेंच टोस्ट गरमागरम सर्व्ह केल्यास त्याची चव अधिक छान लागते. चहा किंवा कॉफीसोबत हा नाश्ता परफेक्ट लागतो.