Jharkhand Crime Saam Tv
क्राईम

Crime: तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, लग्नावरून येताना अपरहण, जंगलात नेऊन आरोपींनी केलं भयंकर कृत्य

Jharkhand Crime: झारखंडमध्ये तरुणीवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. लग्नावरून परत येत असताना आरोपींनी तिचे अपरहण केले आणि जंगलात नेऊन तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे झारखंड हादरले.

Priya More

Summary -

  • झारखंडमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कारा

  • लग्नावरून परत येताना तरुणीचे अपहरण

  • जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप

  • पोलिसांनी तपास सुरू करून संशयितांना ताब्यात घेतलं

झारखंडमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. लग्न समारंभावरून घरी परत येत असताना ५ जणांची तिचे अपहरण केले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना लातेहारच्या सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गुरुवारी रात्री घडली. पीडित तरुणी आदिवसी असून ती लग्नावरून परत येत असताना तिच्यासोबत ही भयंकर घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी तरुणी लग्नासाठी गेली होती. लग्न समारंभ संपल्यानंतर रात्री उशिरा ती घराकडे जात होती. त्याचवेळी गावातील ५ तरुणांनी तिचे अपहरण केले. तिला जंगलात नेऊन तिच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला कुणाला सांगितले तर जीवे मारून टाकू अशी धमकी देऊन जंगलात सोडून दिले.

पीडित तरुणी रात्री उशिरा कशीतरी तिच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचली आणि तिने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला शनिवारी पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी टीम तयार केल्या. या प्रकरणात पोलिसांनी चार संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांच्या अटकेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पीडित तरुणीला पोलिसांनीSummary Points (Marathi)

  • झारखंडमधील लातेहार येथे गंभीर गुन्ह्याची घटना

  • लग्नावरून परत येताना तरुणीचे अपहरण

  • जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप

  • पोलिसांनी तपास सुरू करून संशयितांना ताब्यात घेतले वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. पोलिसांनी सांगितले की, सर्व बाबींचा तपास सुरू असून संपूर्ण प्रकरण लवकरच उघडकीस येईल.

पोलिस निरीक्षक आणि ठाणेदार प्रमोद कुमार सिन्हा यांनी सांगितले की, पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांकडून सामूहिक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार पोलिस तपास करत आहेत. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलिस या प्रकरणात तातडीने कारवाई करत आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना लवकरच अटक केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT