Crime: नववीच्या मुलासोबत महिलेचे शरीरसंबंध; बिंग फुटल्यावर केला धक्कादायक आरोप

Online trap case: लखनऊमध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून अल्पवयीन मुलाला हनी ट्रॅपमध्ये ओढल्याचा आरोप समोर आला आहे. अपहरण, शारीरिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Online trap case
Online trap caseSaam tv
Published On

लखनऊच्या ठाकुरगंज भागात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरण घडलं आहे. एका अल्पवयीन मुलाला सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये ओढून त्याचं अपहरण, शारीरिक संबंध आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आल्याने ही घटना अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.

इंस्टाग्रामवरून वाढली ओळख

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा १६ वर्षांचा मुलगा ९वीत शिकतो. त्याचा एक मित्र सहादतगंज परिसरात राहतो. या मित्राचं त्याच्या घरी नेहमी येणं-जाणं होतं. याच दरम्यान त्या मित्राच्या वहिनीशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि १७ फेब्रुवारीला मुलगा अचानक बेपत्ता झाला.

Online trap case
Crime news: पोटचा गोळा की काळ? आईला चौथ्या मजल्यावरून ढकललं; कारण ऐकून तुमचंही रक्त सळसळेल

नैनीतालमध्ये लागला शोध

मुलगा हरवल्याची तक्रार ठाकुरगंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर मुलगा आणि संबंधित महिला नैनीतालमध्ये असल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी तिथे जाऊन मुलाला सुरक्षित परत लखनऊला आणलं.

व्हिडिओच्या धमकीवरून पैशांची मागणी

काही दिवसांनी आरोपी महिलेने मुलाला फोन करून नैनीतालमध्ये झालेल्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये असं वाटत असेल, तर १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अपहरण, हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

Online trap case
Crime News : मामाचा १७ वर्षांच्या भाचीवर बलात्कार; मुलीमध्ये बदल जाणवू लागताच संशय आला, आपबीती ऐकून आई हादरली

महिलेचेही गंभीर आरोप

दरम्यान ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेत त्या महिलेनेही पोलिसांना पत्र पाठवून वेगळीच बाजू मांडली आहे. तिच्या आरोपानुसार, त्या अल्पवयीन मुलानेच तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिला नैनीतालला जबरदस्तीने नेण्यात आलं आणि नंतर परत आल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा दावा तिने केला आहे. सध्या ही महिला पोलिसांसमोर हजर झालेली नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Online trap case
Shocking crime news: कुऱ्हाडीने पत्नीवर हल्ला, कापलेला पाय घेऊन पती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, नेमकं घडलं काय?

लखनऊमध्ये बहुतेक हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये सामान्यतः तरुण किंवा वयस्कर पुरुषांचा समावेश असायचा. आता तर अल्पवयीन मुलांनाही टार्गेट केलं जात असल्याचं लक्षात आलं. त्यांना सोशल मीडिया किंवा डेटिंग ॲप्सद्वारे आमिष दाखवलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे, अशा अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com