Crime news: पोटचा गोळा की काळ? आईला चौथ्या मजल्यावरून ढकललं; कारण ऐकून तुमचंही रक्त सळसळेल

Murder case Bengaluru: बेंगळुरूमध्ये मुलानेच आपल्या आजारी आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Murder case Bengaluru
Murder case BengaluruSAAM TV
Published On

बेंगळुरूमधून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका मुलानेच आपल्या वृद्ध आणि आजारी आईला चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केली आहे. या मुलावर आरोप झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

कधी घडली ही घटना?

ही घटना बंगळूरच्या आरआर नगर परिसरातील बीईएमएल लेआउटमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास घडली. 72 वर्षीय मृत महिला सवितराम्मा गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्ट्रोकमुळे अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीमुळे त्या पूर्णपणे इतरांवर अवलंबून होत्या. दैनंदिन कामांसाठीही त्यांना इतरांची मदत लागत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवितराम्मा यांचा ४२ वर्षीय मुलगा वेंकटेश यानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याने त्याच्या आईला राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Murder case Bengaluru
Solapur Crime News: सोलापूर हादरलं! फैजानने बायकोला पेट्रोल टाकून पेटवलं

आईच्या आजारपणामुळे मुलगा त्रस्त

तपासादरम्यान असंही समोर आलं आहे की, आईच्या आजारामुळे वेंकटेश मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता. सततची जबाबदारी, ताण आणि परिस्थितीचा सामना करताना तो खचला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ एक प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमकं कारण काय आहे हे संपूर्ण तपासानंतरच समोर येणार आहे.

मुलाला घेतलं ताब्यात

या घटनेनंतर आरआर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी वेंकटेशला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे. घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं, कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचललं गेलं या सर्व गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

Murder case Bengaluru
Crime News: ऑनलाईन ओळख, लग्न आणि गळफास...! लग्नाच्या एका महिन्यानंतर सॉफ्टवेयर इंजिनिअरची आत्महत्या, वाचा काय प्रकरण

याशिवाय, या प्रकरणात आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक वाद यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे.

Murder case Bengaluru
Crime news: घरचे बाहेर गेले असताना घरात घुसला अन्..; शेजारी राहणाऱ्या तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात खळबळ

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. आई-मुलाच्या नात्यातील इतकी टोकाची घटना समोर आल्याने अनेकजण हादरले आहेत. सध्या पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून, लवकरच या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com