जशपूरमध्ये ९ वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरण
१६ वर्षीय आरोपी ताब्यात
बालसुधारगृहात पाठवले, तपास सुरू
परिसरात संताप आणि खळबळ
छत्तीसगडच्या जोशपूरमध्ये एका ९ वर्षीय मुलीवर १६ वर्षाच्या मुलाने बलात्कार केला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालकांसोबत बर्थडे पार्टीला गेलेली असताना पीडित मुलगी लघुशंकेसाठी गेली. या दरम्यान तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला बालसुधार गृहात पाठवले आहे. या घटनेने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी पीडित मुलगी तिच्या आई वडिलांसोबत नातेवाईकांच्या घरी बर्थडे पार्टी साठी गेले होते. यावेळेस १६ वर्षाचा अयान (बदलेलं नाव ) हा देखील त्याच्या कुटुंबासोबत त्या पार्टीमध्ये आला होता. रात्री सुमारे ९:०० वाजता, केक खाल्ल्यानंतर त्यांची मुलगी लघुशंकेसाठी एकटीच घराबाहेर गेली. यावेळेस तिथे अयान गेला त्याने मुलीला पकडले आणि झाडाखाली नेवून तिच्यावर बलात्कार केला.
पार्टीत मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. यावेळेस तिच्या आईवडिलांना मुलगी रडतानाचे आवाज ऐकू आले. पालकांनी तातडीने धाव घेतली असता मुलगी झाडाखाली रडताना आणि घाबरलेल्या अवस्थेत सापडली. मुलीच्या कपडे फाटलेले होते, तिच्या गुप्तांगाला माती आणि पाने चिकटलेली होती. पालकांनी तिची चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी १६ वर्षीय अयानला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर, अल्पवयीन आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि पुरेसे पुरावे सापडल्यानंतर, त्याला ताब्यात घेऊन काही कालावधीसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
जशपूर पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. लाल उमेद सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना अत्यंत संवेदनशील आहे. पोलिसांनी चौकी करदेगाच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे. दरम्यान या प्रकरणी तपास सुरु असून मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.