कांदिवली पूर्व येथे फळ चोरीचा प्रकार उघड
आरोपी रात्री चोरी करून मीरा रोडला विक्री करत होता
सीसीटीव्ही आणि रिक्षाच्या धाग्याने आरोपी पकडला
एक आरोपी अटक, दुसरा फरार; तपास सुरू
संजय गडदे, मुंबई
Mumbai Kandivali Fruit Seller Theft Mira Road News मुंबईत फळ विक्रेत्याच्या नावाखाली सुरू असलेल्या चोरीच्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. कांदिवली पूर्व येथील रस्त्यावरील फळांच्या स्टॉल्सवर रात्रीच्या अंधारात चोरी करून तेच फळे दुसऱ्या दिवशी मीरा रोड येथे स्वतःच्या दुकानात विकणाऱ्या आरोपीला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. रवी चौरसिया (रा. मीरा रोड) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौरसिया रात्री उशिरा बंद असलेल्या स्टॉल्सचे कुलूप तोडून महागडी आणि ताजी फळे चोरी करत असे. ही फळे तो ऑटो-रिक्षाच्या माध्यमातून मीरा रोडला नेत असे आणि दुसऱ्या दिवशी स्वतःच्या स्टॉलवर विक्री करत असे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
कांदिवली पूर्व येथील रामनगर भागातील एका विक्रेत्याने 31 मार्च रोजी चोरीची तक्रार दिली होती. या प्रकरणात सुमारे 12 हजार रुपयांच्या फळांची चोरी झाली होती. याआधीही त्याच परिसरात सुमारे 72 हजार रुपयांची फळे चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अनेक विक्रेत्यांच्या तक्रारी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगेश कुमार पीएसआय कोल्हापूर ए एस आय तोंडवलकर, एच सी ननावरे पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे साबळे आणि भिकले या तपास पथकाने अथक परिश्रम करून आरोपीचा शोध घेतला.
ऑटो-रिक्षाच्या धाग्याद्वारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याचा एक साथीदार फरार आहे. या प्रकरणात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.