नाशिक TCS प्रकरणात मोठा खुलासा
HR निदा खान टेलीकॉलर असल्याचे समोर
६ आरोपी अटकेत, ९ गुन्हे दाखल
ATS कडून सखोल तपास सुरू
प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता
Nashik TCS HR Nida Khan Update नाशिकच्या बहुराष्ट्रीत टीसीएस कंपनीत सुरु असलेल्या कॉर्पोरट जिहाद प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित कंपनीची HR निदा खान ही HR नसून टेलीकॉलर असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच ती गरोदर असून तिचा नवरा मुंबईचा असल्याचे समोर आले आहे. TCS मधील या प्रक्रारानंतर कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आता वर्क फॉर्म होमचे आदेश देण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाराला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील टीसीएस या प्रसिद्ध आयटी कंपनीत बळजबरीने धर्मांतर आणि महिलांचे लैंगिक शोषण केलं जात असल्याचा आरोप होता. याप्रकरणी अनेक व्हिडिओ आणि फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले. या व्हिडिओंमध्ये धर्मांतर केलं जात असल्याचं पाहायला मिळालं. तर या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने असा आरोप केला की, रोजा ठेवणे, बिफ मटण खायला घालने, नमाज पठण करायला लावणे, हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलून त्याला धर्मांतर करण्यास भाग पाडले.
या प्रकरणी ८ पैकी ६ जणांना अटक करण्यात आली असून ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणात संशयित आरोपी असलेली HR निदा खान ही अद्याप फरार असून ती भिवंडीत लपली असल्याचा संशय आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. तसेच ती आपल्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याची माहिती आहे, तिचा नवरा देखील मुंबईतील रहिवाशी असल्याचं समोर आलं आहे.
काल समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खानचं दिल्लीतील बॉम्ब ब्लास्टशी कनेक्शन असल्याचा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी ATS पथकाकडे सोपवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत याप्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता असून घडलेल्या घटनेने नाशिककर संतप्त झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.