Police investigation underway after a 26-year-old man was brutally murdered and his body dumped in a forest pond in Jalgaon, Maharashtra. Saam Tv
क्राईम

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

Friend Murdered By Colleagues In Jalgaon: जळगावमध्ये मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २६ वर्षीय निलेश कासारचा खून करून मृतदेह पोत्यात भरून जंगलातील तलावात फेकण्यात आला.

Omkar Sonawane

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही

दोन जणांनी २६ वर्षाच्या मित्राची निर्घृण हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले अन् जंगलातील तलावात टाकल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. निलेश राजेंद्र कासार असे मृत झालेल्या २६ वर्षाच्या तरूणाचे नाव आहे. भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या असून चौकशी सुरू आहे. दिनेश आणि भूषण यांनी निलेश याचा खून का केला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

निलेश चौधरी हा जामनेरजवळ राहायला आहे. तो आणि भूषण आणि दिनेश हे आरोपी एका फायनान्स कंपनीत कामाला होते. निलेश मागील तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह जंगलातील तलावात आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तत्काळ पोस्टमार्टमसाठी पाठवला अन् चौकशीची चक्रे फिरवली. त्यांनी काही दिवसात आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांची खाकी पाहाताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पण अद्याप खून का केला? हे समोर आलेले नाही.

निलेश याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात बांधून जळगाव तालुक्यातील शिरसोली गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात तलावात फेकून दिला होता. दोन्ही आरोपी हे निलेश याचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. तिघेही एकाच कंपनीत कामाला होते. पण तिघांचे कुठे फिसकटले? याची चर्चा जामनेर अन् परिसरात सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवलाय.

पोलिसांनी तपासाची सूत्रे हालवल्यानंतर भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी यांच्यावर संशयाची सुई आली. त्यांनी त्यांचे लोकेशन स्ट्रेस केले. त्यानंतर सूरतमधून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. जामनेरमध्ये आणल्यानंतर पोलिसांनी आरोपींना खाकीचा हिसका दाखवला अन् जाब विचारला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तरुणाची हत्या करण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस तपास करत आहेत. मयत निलेश आणि संशयित आरोपी हे तिघे एकाच फायनान्स कंपनीत कामाला होते. ते चांगले मित्र असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT