इस्लामपुराचं नाव ईश्वरपुर झालं पण याच ईश्वरपुरातील तालिबानी प्रवृत्तीच्या राक्षसांनी सांगलीत हैदोस घातला. सांगलीत ईश्वरपुरात झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय. एका 14 वर्षांच्या मुलीसोबत जे घडलंय, ते ऐकाल तर तुमच्या अंगाची लाहीलाही होईल. तीव्र संतापानं तुम्ही अस्वस्थ व्हाल.. काय घडलंय. सांगलीत ज्यामुळे अवघा महाराष्ट्र ओशाळला ऐका पोलिसांच्या तोंडून..
भर थंडीत मध्यरात्री एका शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचारानं सांगलीत खळबळ माजली कारण या हैवानांनी या मुलीवर अत्याचार करुन तिला सोडलं नाही तर तिच्या स्त्रीत्वाला तिच्या मानसन्मानाला पार धुळीत मिटवून टाकलंय. सांगलीच्या इस्लामपुरात मध्यरात्री या तरुणांनी या मुलीसोबत जो घृणास्पद प्रकार केला ते ऐकून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित झालेत.
सांगलीत ओशाळला महाराष्ट्र
आठवीत शिकणाऱ्या मुलीचं रात्री अपहरण
बाईकवरुन उसाच्या शेतात नेऊन सामुहिक बलात्कार
विरोध केल्यानंतर चिमुरडीला बेदम मारहाण
अत्याचारानंतर मुलीचे कपडे घेऊन आरोपी पसार
भर थंडीत नग्नावस्थेत मुलीची 1 किलोमीटर पायपीट
ईश्वरपुरात राहणाऱ्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचं रात्री दोघांनी अपहरण केलं आणि बाईकवरुन आष्टा रोडवरील प्रकाश हॉस्पिटलच्या मागील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या चिमुरडीनं विरोध केल्यानंतर तिला या दोघांनी पट्ट्यानं बेदम मारहाण केली. आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी अत्याचारानंतर मुलीचे कपडे घेऊन पळ काढल्यानं हाडं गोठवणाऱ्या थंडीत ही अल्पवयीन मुलगी नग्नावस्थेत 1 किलोमीटर चालत आंबेडकर नाका परिसरात आली. मुलगी बचावासाठी रस्त्यावर आली आणि स्थानिकांनी तिची विचारपुस केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
अमानुष या शब्दाला लाज आणेल असा प्रकार सांगलीत घडला असून मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आता ऋतीक महापुरे आणि आशिष खांबे या दोघांना सैतानांना बेड्या ठोकत पोस्कोतंर्गत कारवाई केलीये. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर याआधी मोक्कातर्गंत कारवाई झाल्याचं पोलिस तपासात समोर आलंय. त्यामुळे एका कोवळ्या जिवाला वेदना देणाऱ्या या आरोपींना पोलिसांचा अजिबात धाक नव्हता हेच या घटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे आता पोलिसांनी अँक्शन मोडमध्ये येऊन महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे पुन्हा दाखवून देण्याची वेळ आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.