Gujarat Crime Saam Tv
क्राईम

Shocking: भयंकर! बहीण तरूणाच्या प्रेमात पडली, भावाच्या डोक्यात हैवान घुसला, चाकूच्या धाकावर दोनदा बलात्कार

Gujarat Crime: गुजरातच्या भावनगरमध्ये भावाने बहिणीवर बलात्कार केला. बहिणीच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाल्यानंतर आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले. बहीण घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला.

Priya More

गुजरातच्या भावनगरमध्ये बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका तरुणाने आपल्या लहान बहिणीवर बलात्कार केला. चाकूचा धाक दाखवत आरोपीने दोन वेळा बहिणीवर बलात्कार केल्याचं भयंकर कृत्य केले. आरोपी विवाहित असून त्याने आपल्या बहिणीसोबत केलेल्या कृत्यामुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भावनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मन सुन्न करणारी घटना भावनगरमधील तळजाजवळ घडली. याठिकाणी राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीवर दोन वेळा बलात्कार केला. बहिणीच्या प्रेमप्रकरणाविषयी भावाला कळाले होते. यावरूनच तो तिला ब्लॅकमेल करत होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात २ वेळा त्याने बहिणीवर बलात्कार केला. त्याने तिच्या मांडीवर सिगारेटचे चटके देखील दिले. दुसऱ्या घटनेनंतर पीडित मुलीने पोलिसांना फोन करून भावाच्या कृत्याविषयी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणीने पोलिसांना सांगितले की तिचे गेल्या ३ वर्षांपासून गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते जे तिच्या भावाला माहिती होते. त्याने या माहितीचा वापर तिला ब्लॅकमेल करण्यासाठी केला. १३ जुलै आणि २२ ऑगस्ट रोजी ती घरी एकटी असताना तिच्या भावाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्याने पीडितेच्या उजव्या मांडीवर सिगारेटचे चटके देखील दिले.

आरोपी विवाहित असून त्याला एक मूल आहे. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर पीडित तरुणी अविवाहित आहे. ती तिचा भाऊ आणि पालकांसोबत राहते. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने आपल्या बहिणीवर पहिला बलात्कार तेव्हा केला जेव्हा त्याची बायको आई-वडिलांना भेटायला गेली होती. तर दुसऱ्यांदा त्याने बहिणीवर बलात्कार तेव्हा केला जेव्हा त्याची बायको कामानिमित्त घराबाहेर गेली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीने वापरलेला चाकू, गुन्ह्यादरम्यान वापरलेले कपडे जप्त केले. आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2)(f)(m) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

RPI Worker Clash : रामदास आठवलेंच्या पक्षात मोठा राडा; अध्यक्षपदावरून २ गटात तुफान हाणामारी, खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या

SCROLL FOR NEXT