तापवलेले की कच्चे, कोणते दूध आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या

Manasvi Choudhary

दूध

दूध आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पौष्टिक मानले जाते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रोज नियमितपणे दूधाचे सेवन करतात.

milk | pinterest

कच्चे दूध

दुधामध्ये शरीराला आवश्यक ती पोषणतत्वे असतात, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते. आजकाल अनेक जण कच्चे दूध पितात.

Milk | pinterest

कच्चे दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

काही जणांच्या मते कच्चे दूध प्यायल्याने ॲलर्जी, दम्याचा त्रास किंवा पचनाची समस्या कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. यासाठी दूध कच्चे प्यावे की तापवून प्यावे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Milk | pinterest

कच्चे दूध म्हणजे काय?

कच्चे दूध म्हणजे असे दूध ज्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. हे दूध तापवलेले नसते.

Boiled Milk Vs Raw Milk | pinterest

कच्चे दूध कसे असते?

गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि घोडी यांसारख्या प्राण्यांमधून दूध काढल्यानंतर ते थेट बाटलीत भरले जाते किंवा वापरले जाते. हे दूधावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. नैसर्गिक स्वरूपातील पोषण देते असे मानले जात असले, तरी त्यात सूक्ष्मजीवांचा धोकाही राहू शकतो.

Milk | pinterest

दूध गरम का करावे?

सहसा दूध पिण्यापूर्वी आपण ते गरम करतो. गरम दूध केल्याने त्यातील हानिकारक जिवाणू नष्ट होण्यास मदत होते.

Milk | pinterest

कच्चे दूध प्यावे की नाही?

कच्च्या दुधामध्ये लिस्टेरिया आणि साल्मोनेला यांसारखे जीवाणू असू शकतात. या जिवाणूंमुळे शरीरात इन्फेक्शन होऊ शकतो तसेच पचायला जड असू शकते.

Boiled Milk Vs Raw Milk | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: लॉकरमध्ये ठेवा या 5 वस्तू; कधीच भासणार नाही पैशांची चणचण

Vastu Tips For Locker
येथे क्लिक करा...