अस्वच्छता आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आठ व्यावसायिकांची तपासणी करून ५१२.१ किलो मिठाई जप्त केली. सुमारे २ लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा हा साठा नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला.
‘एफडीए’च्या परिमंडळ-०६ व ०८ च्या पथकांनी ही मोहीम राबवली. यामध्ये बुधवार पेठ परिसरातील मे. श्रीमंत पेढेवाले, मे. श्री मंगल मूर्ती, मे. मंगलमूर्ती पेढे, मे. धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स, मे. जय गणेश स्वीट सेंटर, मे. अथर्व स्वीट सेंटर, मे. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र आणि मे. श्री कृपा दुग्धालय या व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. तर, मे. श्री मंगल मूर्ती आणि मे. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र हे विनापरवाना सुरू असल्याचे आढळल्याने मंगल मूर्तीला व्यवसाय बंदची नोटीस बजावण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.