Bullet Train India: बुलेट ट्रेन स्टेशनचा थाटच निराळा! सुरत स्टेशनचे फोटो पाहून थक्क व्हाल; पाहा खास सुविधा

Surat Bullet Train Station Photos : भारतातल्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला वेग मिळत असून मुंबई-अहमदाबाद मार्गावरच्या सुरत स्टेशनचे आकर्षक फोटो रेल्वे मंत्रालयाने शेअर केले आहेत.
India Bullet Train Photos
India Bullet Train Photosmeta ai
Published on: 
India Bullet Train
India Bullet Traingoogle

भारतातली पहिली बुलेट ट्रेन सुरू होण्याची वाट आता आणखी जास्त दिवस पाहावी लागणार नाही. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रोजेक्टचं काम वेगाने सुरू आहे. या बुलेट ट्रेन धावण्याची तयारी केली जातेय. महत्त्वाचं म्हणजे, या बुलेट ट्रेन मार्गावरच्या सुरत स्टेशनचे काही सुंदर फोटो रेल्वे मंत्रालयाने शेअर केले आहेत.

Surat Bullet Train Station
Surat Bullet Train Stationgoogle

२०२७ मध्ये सुरू होणार पहिली बुलेट ट्रेन

देशातली पहिली बुलेट ट्रेन सेवा २०२७ च्या शेवटच्या तिमाहीत सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे भारताच्या रेल्वे प्रवासात मोठा बदल होणार आहे.

Mumbai Ahmedabad High Speed Rail
Mumbai Ahmedabad High Speed Railgoogle

सुरत ते वापी दरम्यान पहिली सेवा

सुरुवातीला गुजरातमधील सुरत आणि वापी या दोन शहरांदरम्यान बुलेट ट्रेन धावण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्गाचा विस्तार केला जाणार आहे.

Bullet Train Station Photos
Bullet Train Station Photosgoogle

सुरत स्टेशनचे आकर्षक इंटिरियर

रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुरत स्टेशनचे सुंदर इंटिरियर दिसत आहे. स्टेशनची रचना आधुनिक आणि आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे.

Bullet Train Station Photos
Bullet Train Station Photos

स्टेशनमध्ये एसीची सुविधा

स्टेशनच्या छतावर कॅसेट एसी युनिट्स दिसत आहेत. त्यामुळे स्टेशन परिसर वातानुकूलित ठेवण्याची व्यवस्था असल्याचे फोटोंमधून दिसून येते.

India’s First Bullet Train Update
India’s First Bullet Train Updatesaam tv

प्रवाशांसाठी एस्केलेटरची व्यवस्था

सुरत बुलेट ट्रेन स्टेशनवर एस्केलेटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाणे अधिक सोयीचे होणार आहे.

MUMBAI-AHMEDABAD BULLET TRAIN PROJECT
MUMBAI-AHMEDABAD BULLET TRAIN PROJECTSaam Tv

स्टेशनचा बर्ड्स आय व्ह्यू फोटोही शेअर

रेल्वे मंत्रालयाने स्टेशनचा वरून घेतलेला फोटोही शेअर केला आहे. यात स्टेशनची भव्य रचना आणि त्याचा एकूण आकार पाहायला मिळतो.

MUMBAI-AHMEDABAD BULLET TRAIN PROJECT
MUMBAI-AHMEDABAD BULLET TRAIN Saam Tv

OHE सिस्टीमही झाली कार्यान्वित

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील सुरत-बिलीमोरा सेक्शनमध्ये ओव्हरहेड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट (OHE) सिस्टीम यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी ही महत्त्वाची पायरी मानली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.