
परळी रेल्वे स्थानकावर सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवली
अवघ्या ५ तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या
बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच परळीतून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. परळी रेल्वे स्थानकावर सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या ५ तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथून १ कुटुंब मुलांसह परळी येथे आले होते. दुपारच्या सुमारास रेल्वे स्थानकावर जेवण करून कुटुंब झोपले. दरम्यान, परळी रेल्वे स्टेशनवर आरोपी आला. नराधमाची नजर ६ वर्षीय चिमुकलीवर पडली. तिला उड्डाणपुलाकडे घेऊन गेला. नंतर तिच्यावर बलात्कार केला.
लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी फरार झाला. यानंतर चिमुकली ओरडून रडायला लागली. परिसरातील लोकांना चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुकलीचा रक्तस्त्राव होत असल्याचं पाहिलं. त्यांनी घटनेची तत्काळ माहिती संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनजंय ढाने यांना दिली.
पोलिसांनी तातडीने चिमुकलीला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले. यावेळी तिचे आई वडिलही उपस्थित होते. चिमुकलीचे हाल पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे घटनास्थळी होत त्यांनी तपासाला सुरूवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक, पोलीस स्टेशन संभाजीनगर, स्था.गु.शा. यांनी अथक परिश्रम करून तपास केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले. पोलिसांनी ५ तासांच्या आत आरोपीला शोधून काढले. आरोपी बरकत नगर भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.