पुरामुळे प्रचंड हाहाकार, ५ लाख लोक बेघर, जनावरं पाण्यात वाहून गेली, आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू

Flood Disaster news: पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, पंजाब प्रांतातील हजारो गावे पाण्याखाली. आतापर्यंत ८३५ लोकांचा मृत्यू, त्यापैकी ११५ मृत्यू पंजाबमध्ये.
Flood Disaster news
Flood Disaster newsSaam Tv news
Published On
Summary
  • पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, पंजाब प्रांतातील हजारो गावे पाण्याखाली.

  • आतापर्यंत ८३५ लोकांचा मृत्यू, त्यापैकी ११५ मृत्यू पंजाबमध्ये.

  • सुमारे ५ लाख लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, ४ लाख प्राणी वाचवले.

  • ८०० बोटी व १,३०० बचाव कर्मचारी पुरग्रस्त भागात कार्यरत.

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. पंजाब प्रांतातील अनेक गावे पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत. लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुरामुळे सुमारे ५ लाख लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेत अनेकांचा मृत्यूही झाला आहे.

पंजाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनीवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, २६ जूनपासून पावसाळ्यात सुमारे ८३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ११५ एकट्या पंजाब प्रांतातील लोकांचा मृत्यू झाला आहे.

Flood Disaster news
मुंबईकरांची कोंडी; आझाद मैदान, CSMTकडे जाणारे सर्व मार्ग बंद, दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या अनेक मार्गातही बदल

तिन्ही नद्यांचे पाणी दुथडी भरून वाहत आहे

भारताच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधून वाहणाऱ्या तीन नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. याचा थेट फटका नद्यांच्या आजूबाजूच्या २,३०० हून अधिक गावांना बसला आहे. पंजाब प्रांतीय सरकारने चिनाब, रावी आणि सतलज नद्यांचे वाढते पाणी वळविण्यासाठी पूर धरणांचे नियंत्रित कटिंग सुरू केले आहे. स्थानिक माध्यमांनुसार, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही प्रमुख नद्यांना एकाचवेळी पूर आला आहे.

Flood Disaster news
हरिहर किल्ल्यावरून उतरताना तोल गेला, खोल दरीत पडला; युवकाचा जागीच मृत्यू

अनेक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले

पंजाब सरकारच्या मदत सेवा प्रमुख नबील जावेद यांनी सांगितले की, या भयानक पुरात अडकलेल्या ४ लाख ८० हजार लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. तसेच सुमारे ४ लाख प्राण्यांनाही वाचवण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, या पुराचा थेट फटका १५ लाखांहून अधिक लोकांना बसला आहे.

Flood Disaster news
१३ महागड्या गाड्या, करोडोंचे दागिने; 'या' श्रीमंताचा खजिना पाहून ई़डीही थक्क झाली

आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे इरफान अली खान यांनी एका निवेदनात म्हटलं की, ८०० हून अधिक बोटी आणि १,३०० हून अधिक बचाव पथकातील कर्मचाऱ्याकडून बचावकार्य सुरू आहे. बहुतांश कुटुंब नदीच्या काठावर राहतात. या महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पुरात अडकून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सध्या परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com