पवारांचं जंतरमंतर फार थोड्या लोकांना कळतं! डिलिमिटेशनवरून राज ठाकरेंची टीका

Maharashtra Politics : डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट दोन्ही गटांची भूमिका आणि भविष्यातील सत्तासमीकरणांवर त्यांनी भाष्य केलंय.

डिलिमिटेशनवरून 'इंडिआ' आघाडीत राजकीय रणकंदन माजलंय. शरद पवार गट डिलिमिटेशनला पाठिंबा देणारा असल्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खरमरती टीका केलीय.शरद पवार गट आज ना उद्या सत्तेत जाणार असल्याचा टीका करत राज ठाकरेंनी शरद पवारांवर शरसंधान साधलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांनी तीन वर्षे भांडणाचं नाटक केलं. आता दुसरी टीमही सत्तेच्या दिशेने निघालीय. शरद पवारांच्या राजकीय खेळीचा उल्लेख करत त्यांनी याला 'पवारांचं जंतरमंतर' असं म्हटलंय.

राज ठाकरेंनी एक्स या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक गट भाजपच्या दिशेने गेल्याच्या घटनेची आठवण करून दिली. त्यावेळीच आपण याबाबत भाष्य केलं होतं, असं त्यांनी सांगितलं. पुढील तीन वर्षे दोन्ही राष्ट्रवादी गटांनी भांडण सुरू असल्याचं चित्र निर्माण केलं; मात्र आता दुसरी टीमही सत्तेच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

शरद पवारांचं राजकीय जंतरमंतर ते फार थोड्या लोकांना समजतं. राष्ट्रवादीची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झालीय. काही दिवसानंतर दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी दाखल होईल, असा दावा त्यांनी केला.

भाजपला शिंदेंचं वाढतं महत्त्व रुचत नव्हतं?

महाराष्ट्र भाजपला एकनाथ शिंदे यांना दिलं जाणारं महत्त्व रुचत नव्हतं, असंही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. या राजकीय परिस्थितीवर उतारा म्हणून नवी खेळी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.