Crime News Yandex
क्राईम

Crime News: हनी ट्रॅपमध्ये अडकला माझगाव डॉकमधील कर्मचारी; पाकिस्तानला सिक्रेट माहिती पुरवल्याप्रकरणी अटक

Sharing Sensitive Information To Pakistani Agent: एटीएसने महाराष्ट्रातील माझगाव डॉकयार्ड येथून एका तरुणाला अटक केली आहे. पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवत असल्याचा संशय त्याच्यावर व्यक्त केला जात आहे.

Rohini Gudaghe

Mazagon Dock Worker In Honey Trap

एटीएसने राज्यातील माझगाव डॉकयार्डमधील (Mazagon Dock) एका तरुणाला अटक केली. त्याच्यावर कथितरित्या पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. या तरुणाला पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवलं असल्याची माहिती मिळत आहे.  (Latest Crime News)

महाराष्ट्र एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) ने माझगाव डॉकयार्ड येथे काम करणाऱ्या एका तरूणा अटक केली आहे. कल्पेश बैकर असं या ३१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो प्रतिबंधित क्षेत्रांबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना देत होता, असा त्याच्यावर आरोप (Crime News) आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती मिळत आहे. पोलीस कल्पेशची चौकशी करत आहेत. तो हनी ट्रॅपमध्ये कसा अडकला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरूण हनी ट्रॅपमध्ये अडकला

या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अधिकृत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर एका महिलेशी बोलत (Mazagon Dock Worker In Honey Trap) होता. तो त्या महिलेनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकत होता. त्याने या महिलेशी देशाशी संबंधित महत्त्वाची संवेदनशील माहिती शेअर केली होती. त्या बदल्यात पैसेही घेतले, असा या तरूणावर आरोप आहे.

आरोपीशी बोलणारी महिला पीआयओची एजंट ( Pakistani Agent) असल्याचा दावा एटीएसच्या सूत्रांनी केला आहे. या व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून ती संवेदनशील माहिती गोळा करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश गेल्या काही वर्षांपासून माझगाव डॉकयार्डमध्ये काम करत होता. मे 2014 मध्ये त्यानी या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तो मूळचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग भागातील रहिवासी आहे.

संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवली

या तरूणाने शिपयार्डमध्ये बांधल्या जाणाऱ्या युद्धनौका आणि इतर जहाजांची माहिती पाकिस्तानला पाठवली असल्याचा आरोप केला जात (Honey Trap News) आहे. माझगाव डॉक ही 248 वर्षे जुनी जहाज बांधणी कंपनी आहे. ती ब्रिटिशांनी सुरू केली होती. आज देशात 12 सरकारी जहाज गोदी आहेत, 40 हून अधिक खाजगी कंपन्या या क्षेत्रात आहेत.

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही महाराष्ट्र एटीएसने २३ वर्षीय तरुणाला अटक केली (Sharing Sensitive Information With Pakistan) होती. हा तरूण देखील माझगाव डॉकयार्डमध्येही काम करत होता. तो पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या एजंटसोबत गुप्त माहिती शेअर करत होता. गौरव पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT