Navneet Rana Threat News : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तान कनेक्शन आलं समोर

Navneet Rana News : नवनीत राणा यांना व्हॉट्सअॅपवर क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. याबाबत नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Navneet Rana
Navneet Rana saam Tv

अमर घटारे | अमरावती

Amravati News :

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती पोलिसांकडून मिळली आहे. नवनीत राणा यांना 3 मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.

याबाबत नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम 354 A,354 D,506 (2),67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी सुद्धा नवनीत राणा यांना धमक्या आल्या होत्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navneet Rana
Accident News: महिला पोलीस कॉन्स्टेबलचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू, नाहूर स्थानकातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना एका परदेशी फोन नंबरवरुन व्हॉट्सअॅपला एक ऑडिओ क्लीप आली होती. या क्लीपमध्ये नवनीत राणा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जवळपास तीन मिनिटांची ही ऑडिओ क्लीप होती. (Latest Crime News)

Navneet Rana
Crime News : उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या, पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

दुपारी 2 वाजून 9 मिनिटांनी ही ऑडिओ क्लीप आली होती. त्यानंतर 2 वाजून 13 मिनिटाने याच नंबरवरुन व्हॉट्सअप व्हाईस कॉल आला, जो नवनीत राणा यांनी उचलला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी आणखी एक ऑडिओ क्लीप आली. त्यामुळेही भाजपच्या मोठ्या नेत्यांनाही शिवीगाळ करत धमकी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं देखील नाव या ऑडिओ क्लीपमध्ये घेण्यात आलं आहे. अफगाणिस्तानने अमेरिकेची जशी वाट लावली तशीच भारताचीही आम्ही वाट लावू शकतो. आम्ही ठरवलं तर क्षणात काहीही करु शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.

असदुद्दीन ओवैसी यांची चौकशी झाली पाहिजे - रवी राणा

खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तानमधून आलेल्या धमकीबाबत बोलताना आमदार रवी राणा यांनी म्हटलं की, असदुद्दीन ओवैसी यांची देखील चौकशी झाली पाहिजे. कारवाई देखील झाली पाहिजे. ओवीसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरचं बाहेर येईल. त्याचा तपास झाला पाहिजे.

लोकसभेमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. अनेकदा ओवैसीच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्या आहेत. माझं रश्मी शुक्ला यांच्याशी बोलणं झालं ATS ची चौकशी लागली. देशाला उडवून देण्याची धमकी दिली. गृह विभाग चौकशी करत आहे, असंही रवी राणा यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com