
पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या सीमा भागात कुरघोड्या सुरु आहेत. अनेकवेळा सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न देखील करण्यात आले आहेत. यातच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारताच्या संवेदनशील आस्थापनांची गुप्त माहिती मिळवण्यासाठी विविध कट रचत आहे.
यातच पंजाबमध्ये तैनात सैनिक, पोलीस कर्मचारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेने गुप्त माहिती काढण्याचे असे प्रयत्न नेहमीच हाणून पाडले आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी अलीकडेच पंजाब राज्य पोलीस मुख्यालयाला पाठवलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, महिला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हने (पीआयओ) ते शोधत असलेली माहिती मिळविण्यासाठी सोशल मीडियावर हनी ट्रॅपचा कट रचला आहे.
केंद्रीय गुप्तचर संस्थांनी अशा 14 सोशल मीडिया प्रोफाइलची यादी जारी केली आहे, ज्याच्या संदर्भात सैन्य आणि पंजाब पोलीस कर्मचाऱ्यांनाही सतर्क करण्यात आले आहे.
केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अलर्टमध्ये असे म्हटले आहे की, भारतीय सैन्य, नौदल, हवाई दलाचे अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक हे त्यांचे लक्ष्य होते. ज्यांना सोशल मीडियावर सुंदर महिलांचे पीआयओकडून आमिष दाखवले जात आहे. पंजाब पोलिस अधिकाऱ्यांनी आज तकला सांगितले की, हे पीआयओ लष्कर आणि पोलिस अधिकारी तसेच त्यांच्या नातेवाईकांना अडकवण्यासाठी सोशल मीडिया अॅप्सवर बनावट फोटो वापरतात. (Latest Marathi News)
पंजाब पोलिसांच्या डीजीपी कार्यालयाने अशा 14 संशयास्पद प्रोफाइलची यादी जारी केली आहे, जी भारतीय अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप करण्यासाठी तयार करण्यात आली होती. या यादीत अनिया राजपूत, अलिना गुप्ता, अन्या अन्या, दीपा कुमारी, इशानिका अहिर, मनप्रीत प्रीती, नेहा शर्मा, परीशा अग्रवाल, प्रिया शर्मा, श्वेता कपूर, संगीता दास, तारिका राज, परिशा आणि पूजा अतर सिंग या नावांचा समावेश आहे. महिला म्हणून या पीआयओ फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.