Pune Crime News : १० वीचा पेपर देऊन घरी परतताना विद्यार्थ्यांवर हल्ला; वर्गात भांडण झाल्याने बेदम मारहाण

10th Student Was Beaten Up : चार अन्य विद्यार्थी आणि मारहाण झालेला विद्यार्थी दहावीत शिकत आहेत. या सर्वांचे सेंटर आणि वर्ग एकच आहे. वर्गात काही कारणावरून त्यांचा एकमेकांशी वाद झाला. या वादाचा राग चारही मित्रांच्या मनात होता.
Pune Crime News
Pune Crime News Saam TV
Published On

सचिन जाधव

Pune Crime :

पुण्यात गुन्हेगाराीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील कात्रज परिसरात एका १० वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी परीक्षा देऊन घरी निघाला होता त्यावेळी त्याला चार जणांनी घेरलं आणि बेदम मारहाण केली.

Pune Crime News
Pune News: अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद: उपमुख्यमंत्री अजित पवार

मारहाणीचं कारण काय?

चार अन्य विद्यार्थी आणि मारहाण झालेला विद्यार्थी दहावीत शिकत आहेत. या सर्वांचे सेंटर आणि वर्ग एकच आहे. वर्गात काही कारणावरून त्यांचा एकमेकांशी वाद झाला. या वादाचा राग चारही मित्रांच्या मनात होता. त्यांनी तरुणाला वर्गाबाहेर आल्यानंकर कात्रज परिसरात आडवले आणि त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये विद्यार्थी जखमी झाला आहे.

सदर घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याबाबत मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थी आणि त्याचा मित्र दहावीत आहेत. दोन दिवसांपूर्वी परीक्षा देऊन ते आंबेगाव बुद्रुक स्मशानभूमी परिसरातील पीएमपी बसथांब्यावर आले होते. तेथे दोघेही गप्पा मारत बसलेले. त्यावेळी अन्य चार जण तेथे आले.

वर्गात झालेल्या भांडणाचा राग मनात घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी दोघांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच नंतर त्यांनी मारहाण देखील केली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News
Washim Crime News : वाशिममध्ये घटना घडली होती, टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ५ जणांना धरलं; अकोला, बुलडाणा कनेक्शन उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com