चेतन व्यास
वर्धा : तंत्रज्ञानाच्या जोरावर सर्व काही ऑनलाइन उपलब्ध असल्याने सगळी कामे सोपी झाली आहेत. मात्र, या इंटरनेट, (Wardha) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची फसवणूकही केली जात आहे. सध्या सायबर भामट्यांनी नवा फंडा सुरू केला असून, बाहेर राज्यात, देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना (Cyber Crime) कॉल करून तुमचा मुलगा गंभीर गुन्ह्यात फसल्याची बतावणी करून लाखो रुपयांची मागणी करण्याचा प्रकार पुढे आला आहे. वर्धा सायबर सेलकडे जवळपास १० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (Maharashtra News)
सायबर गुन्हेगार हे फसवणूक (Fraud) प्रामुख्याने दोन पद्धतीने करत आहेत. सर्वप्रथम समोरची व्यक्ती कुरिअर सर्व्हिसचे प्रतिनिधी असल्याचे भासवते. आमच्याकडे एक पाकीट आले असून, यात बेकायदा वस्तू आहेत. या कृत्यात तुमचा मुलगा सापडला आहे, असे सांगितले जाते, तर दुसऱ्या प्रकारच्या पद्धतीत समोरची व्यक्ती मी पोलिस (Police) अधिकारी आहे; असे सांगत मुलगा वा मुलीवर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसात १० तक्रारी
वर्ध्यातील उच्च पदस्थ, तसेच शासकीय अधिकाऱ्यांची मुले बाहेरील राज्यासह बाहेर देशात उच्च शिक्षण घेत आहेत. अशांच्या पाल्यांचा डेटा चोरून सायबर भामटे त्यांच्या पालकांना फोन करून तुमचा मुलगा वा मुलगी गंभीर गुन्ह्यात सापडला आहे. आम्ही पोलिस ऑफिसर बोलत असून त्यांना वाचविण्यासाठी पैसे द्यावे लागेल; असे म्हणत पैशांची मागणी करत आहेत. जवळपास दहा तक्रारी मागील पाच दिवसांत (Cyber Police) सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.