Chhatrapati Sambhajinagar Latest News:  Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar: १२ कोटींसाठी कामगारांनीच रचला बड्या उद्योजकाच्या अपहरणाचा कट, एका टीपने प्लॅन फसला; व्यापारी भयभीत

Chhatrapati Sambhajinagar Latest News: २ कोटींसाठी एका बड्या व्यावसायिकाच्या अपहरणाचा कट रचला जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर उद्योज जगतात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर, |ता. २१ जून २०२४

छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ कोटींसाठी एका मोठ्या उद्योग समूहाच्या उद्योजकाच्या अपहरणाचा कट रचला जात असल्याचे उघडकीस आले होते. या अपहरणाच्या कटाने संभाजीनगरच्या वाळूज, शेंद्रा एमआयडीसीमधील उद्योजक भयभीत झाले आहेत. या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांची भेट घेऊन याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बड्या उद्योजकाच्या अपहरणाचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. १२ कोटींसाठी एका बड्या व्यावसायिकाच्या अपहरणाचा कट रचला जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर उद्योज जगतात एकच खळबळ उडाली आहे.

नामांकित समुहाचे व्यवस्थापकीय संचालक, उद्योगपती काही दिवसांपूर्वी जवाहरनगर भागात एका रेस्टॉरंटवर गेले होते. त्यावेळी एका तरुणाने तुमचे अपहरण करणार असल्याचे सांगितले. ही बाब ऐकताच उद्योजक पुरते घाबरून गेले. त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

गेल्या २० दिवसांपासून पोलिस तपास करत असलेल्या या प्रकरणात पाच दिवसांपूर्वी धक्कादायक वळण मिळाले. १२ कोटी रुपयांसाठी काही कामगारांकडून उद्योजकाच्या अपहरणाचा कट रचला जात होता शहरातील उद्योजकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपायुक्तांनी बैठक घेत मसिआच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, वाळूज, एमआयडीसी वाळूज व चिकलठाणा एमआयडीसीच्या परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले. वाढत्या गुन्ह्यांमुळे कामगार वर्ग भयभीत असतानाच उद्योजकाच्या अपहरणाचा कट रचला जात असल्याच्या वृत्ताने उद्योग क्षेत्र हादरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

Saif Ali Khan: 'हल्लेखोराकडे एक नाही तर दोन चाकू...'; ८ महिन्यांनंतर सैफ अली खानने केला त्या रात्रीचा धक्कादायक खुलासा

Air Purifying Plants: प्रदूषणाने त्रस्त आहात? तर घरात लावा ही 5 झाडे, हवा राहील शुद्ध

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडी मोर्चा

SCROLL FOR NEXT