Pune Sassoon Hospital: पोर्श कार प्रकरणानंतर सलग दुसऱ्यांदा ससून रुग्णालयाचे डीन बदलले, आता कोणाला मिळाली जबाबदारी?

Pune Sassoon Hospital News: सतत चर्चेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयाचे डीन सलग दुसऱ्यांदा बदलण्यात आले आहेत. आता रुग्णालयातील नवीन डीन कोण असणार आहे, हे जाणून घेऊ...
पोर्श कार प्रकरणानंतर सलग दुसऱ्यांदा ससून रुग्णालयाचे डीन बदलले, आता कोणाला मिळाली जबाबदारी?
Pune Sassoon Hospital NewsSaam TV

नितीन पाटणकर, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोर्श कार अपघात प्रकरणानंतर सलग दुसऱ्यांदा ससून रुग्णालयाचे डीन बदलण्यात आले आहे. अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेले डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडून शासनाने पदभार काढून घेतला आहे. आता डॉ. एकनाथ पवार हे ससून रुग्णालयाचे नवीन डीन असणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालय ड्रग माफिया ललित पाटील आणि नंतर पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे चर्चेत आहेत. ससूनमध्ये दोन महत्त्वाची पदे आहेत, यात डीन आणि सुपरिटेंडेंट यांचा समावेश आहे. यांच्याच सातत्याने बदल्या करण्यात येत आहे.

पोर्श कार प्रकरणानंतर सलग दुसऱ्यांदा ससून रुग्णालयाचे डीन बदलले, आता कोणाला मिळाली जबाबदारी?
VIDEO: भाजपाचा शिंदेंच्या सेनेत हस्तक्षेप? रामदास कदमांनी केले गंभीर आरोप, रावसाहेब दानवेंनी दिलं प्रत्युत्तर

यातच अगदी काही दिवसांपूर्वी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची ससून रुग्णालयात डीन म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्याकडे तात्पुरते पदभार देण्यात आलं होतं. ते सध्या बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन असून काही दिवसांत त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. एकनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यातच डॉ. एकनाथ पवार यांची ससून रुगालयात करण्यात आलेली नियुक्ती ही देखील तात्पुरत्या स्वरूपाची आहे. डॉ. पवार हे मुंबईमधील ग्रँड शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना येतील पदभार सांभाळून ससूनच्या डीनपदाचा पदभार सांभाळावा लागणार आहे.

पोर्श कार प्रकरणानंतर सलग दुसऱ्यांदा ससून रुग्णालयाचे डीन बदलले, आता कोणाला मिळाली जबाबदारी?
MNS VIDEO: मराठी गाणं वाजवण्यास दिला नकार, सुट्टा चाय दुकानात मनसेचं खळ्ळ खट्याक; पाहा व्हिडिओ

यातच इतकं महत्त्वाचं पद असताना शासन पूर्णवेळ डीन का नियुक्त करत नाही, सुपरिटेंडेंट का नियुक्त करा नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com