Sassoon Hospital: रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची कुटुंबीयांवर वेळ, ससून रुग्णालयातील धक्कादायक VIDEO समोर

Sassoon Hospital Shocking Video: ससून रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची कुटुंबीयांवर वेळ आल्याचा हा व्हिडीओ आहे.
Sassoon Hospital: रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची कुटुंबीयांवर वेळ, ससून रुग्णालयातील धक्कादायक VIDEO समोर
Sassoon Hospital VideoSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यातील ससून रुग्णालय (Pune Sassoon Hospital) वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. पोर्शे कार अपघातातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणात ससून रुग्णालय चर्चेत आहे. अशामध्ये आता ससून रुग्णालयातून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओवरून ससून रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे. ससून रुग्णालयामध्ये आपल्या रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची कुटुंबीयांवर वेळ आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

ससून रुग्णालय हे पुणे आणि आसपासच्या परिसरातील गरीब आणि सामान्य रुग्णांसाठी मोठा आधार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालय हे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण आणि पोर्शे कार अपघातातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या प्रकरणामुळे जास्त चर्चेत राहिले.

सामान्य रुग्णांची ससून रुग्णालयामध्ये हेंडसाळ होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या रुग्णाला कुटुंबातील चार जणांना स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. हे सर्वजण रुग्णाला एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये घेऊन जात आहेत.

Sassoon Hospital: रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची कुटुंबीयांवर वेळ, ससून रुग्णालयातील धक्कादायक VIDEO समोर
Old Pune Mumbai Highway Traffic: वडगावमधील मातोश्री चौकात ग्रामस्थांचा रास्ता राेकाे, जाणून घ्या जुना मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतुकीची स्थिती

या घटनेमुळे ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ससून रुग्णालयामध्ये स्टाफ कमी आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जावे लागत आहे का?, असा सवाल केला जात आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालय प्रशासन रुग्णांकडे दुर्लक्ष करत आहे का? असा देखील संतप्त सवाल विचारला जात आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sassoon Hospital: रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची कुटुंबीयांवर वेळ, ससून रुग्णालयातील धक्कादायक VIDEO समोर
Pune Video : भिंत कोसळून मोठी दुर्घटना, एकाचा दुर्दैवी मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com