VIDEO: भाजपाचा शिंदेंच्या सेनेत हस्तक्षेप? रामदास कदमांनी केले गंभीर आरोप, रावसाहेब दानवेंनी दिलं प्रत्युत्तर

BJP Vs Shinde Group: भाजप शिंदेंच्या शिवसेनेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. मात्र भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी कदम यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
भाजपाचा शिंदेंच्या सेनेत हस्तक्षेप? रामदास कदमांनी केले गंभीर आरोप, रावसाहेब दानवेंनी दिलं प्रत्युत्तर
Ramdas Kadam Vs Raosaheb DanveSaam Tv

विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाच्या जागावाटपात भाजपने हस्तक्षेत करू नये. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हस्तक्षेपामुळेच शिंदे गट चार ते पाच जागा हरल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

कदमांच्या आरोपानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. रामदास कदम यांचे आरोप भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी फेटाळले आहेत.

भाजपाचा शिंदेंच्या सेनेत हस्तक्षेप? रामदास कदमांनी केले गंभीर आरोप, रावसाहेब दानवेंनी दिलं प्रत्युत्तर
MNS VIDEO: मराठी गाणं वाजवण्यास दिला नकार, सुट्टा चाय दुकानात मनसेचं खळ्ळ खट्याक; पाहा व्हिडिओ

शिवसेनेच्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या समोरच रामदास कदम म्हणाले की, ''लोकसभा निवडणुकीत आपण गाफील राहू नये.'' त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करत म्हटलं की, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा की, जसे भाजपचे उमेदवार दोन महिन्यांआधी दिले, तसे शिवसेने उमेदवार दोन महिन्यांआधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं.

रावसाहेब दानवे काय म्हणाले, ''अशी वेगवगेळी गणितं राजकारणात मांडली जातात. याचा अर्थ असा नाही की, जागा आधी जाहीर झाल्या असत्या तर निवडून आले असते. आमचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार ऐनवेळेला जाहीर करण्यात आला आणि ते निवडून आले. अनेक उमेदवार असे आहेत.''

भाजपाचा शिंदेंच्या सेनेत हस्तक्षेप? रामदास कदमांनी केले गंभीर आरोप, रावसाहेब दानवेंनी दिलं प्रत्युत्तर
laxman hake : मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर समाधानी नाही; ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांच्या या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com