MNS VIDEO: मराठी गाणं वाजवण्यास दिला नकार, सुट्टा चाय दुकानात मनसेचं खळ्ळ खट्याक; पाहा व्हिडिओ

Airoli MNS VIral Video: नवी मुंबईतल्या ऐरोलीत मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय दुकानदाराला चोप दिला दिलाय. ऐरोली सेक्टर 3 इथल्या सुट्टा चाय या दुकानात मराठी गाणं वाजवण्यास नकार दिला म्हणून मनसैनिकांनी चोप दिलाय.
मराठी गाणं वाजवण्यास दिला नकार, सुट्टा चाय दुकानात मनसेचं खळ्ळ खट्याक; पाहा व्हिडिओ
Airoli MNS VIral VideoSaam Tv

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबईमधील ऐरोलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय दुकानदाराला चोप दिला आहे. ऐरोली सेक्टर 3 येथील 'सुट्टा चाय' या दुकानात मराठी गाणं वाजवण्यास नकार दिल्यानं या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.

हिंदी गाणं वाजत असताना मराठी गाण लावण्यास सांगितलं असता या दुकानदाराने नकार दिला होता. या दुकानदाराने मराठी गाणं लावणार नाही असं उद्धटपणे बोलल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी गाणं वाजवण्यास दिला नकार, सुट्टा चाय दुकानात मनसेचं खळ्ळ खट्याक; पाहा व्हिडिओ
Viral Video: व्वा! नैनो में सपना गाण्यावर तरुणाचा गजब डान्स; VIRAL व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली सेक्टर 3 मध्ये सुट्टा चाय नावाचं हे दुकान आहे. या दुकानात काही मराठी तरुण बसेल होते. यावेळी दुकानात हिंदी गाणं वाजत होतं. त्यावेळी तरुणांनी मराठी गाणं वाजवावं, असं दुकानदाराला सांगितलं. हा दुकानदार परप्रांतीय आहे. त्याने उद्धटपणे मराठी गाणं लावणार नाही, असं या तरुणांना सांगितलं.

मराठी गाणं वाजवण्यास दिला नकार, सुट्टा चाय दुकानात मनसेचं खळ्ळ खट्याक; पाहा व्हिडिओ
Viral Video: कहरच झाला! आता आईस्क्रिमनंतर वेफर्समध्ये निघाला बेडूक; किळसवाणा व्हिडिओ पाहून खाण्याची इच्छा उडेल

यानंतर याबाबतची माहिती या तरुणांनी स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते ज्या दुकानात मराठी गाणं वाजवण्यास नकार दिला, त्या दुकानात गेले. त्यांनी मराठी गाणं वाजवण्यास नकार का दिला, असं म्हणत त्या दुकानदाराला चांगलाच चोप दिला आहे. या प्रकार घडत असताना दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com