लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पीयूष गोयल, आश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे या देखील बैठकीला हजर होत्या.
तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपयशावर विचार मंथन करण्यात आले. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रात जे अपयश आले, त्यानंतर भाजपच्या नेतृत्वात बदल होईल अशी चर्चा होती.
पण महाराष्ट्राच्या भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बैठकीनंतर माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ४१ जागा जिंकणाऱ्या महायुतीला २०२४ मध्ये इतका मोठा फटका का बसला? याची कारणेही बैठकीत मांडण्यात आली.
आलेलं अपयश विसरून नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे, असं केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितलं. आगामी निवडणुकीसाठी महायुतीकडून समन्वय समितीची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. लोकसभा निवडणूकीत झालेल्या चुका टाळण्यासाठी उमेदवाराच्या कँपेनसाठी ही समन्वय समिती काम करणार आहे.
बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या यश-अपयशावर चर्चा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला केवळ ०.३ टक्के मतं कमी पडले, असं फडणवीस म्हणाले.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना समोरं जाताना काय केलं पाहिजे, घटकपक्षांना सोबत घेऊन कशा पद्धतीने पुढे जाता येईल. यावर आमची सविस्तर चर्चा झाली असून अत्यंत ताकदीने आम्ही पुढच्या निवडणुका लढणार आहोत. भाजपमध्ये कुठलाही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असंही फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.