VIDEO: काकांचा दुष्काळी दौरा, दादांना टेंशन? बारामती पिंजून काढण्यासाठी पवार मैदानात

Sharad Pawar: लोकसभेत अजित पवारांना शह दिल्यानंतर शरद पवारांनी आता मिशन बारामती विधानसभा हाती घेतलंय. दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं पवारांनी बारामती तालुका पिंजून काढण्यास सुरूवात केलीय.
काकांचा दुष्काळी दौरा, दादांना टेंशन? बारामती पिंजून काढण्यासाठी पवार मैदानात
Sharad Pawar and Ajit PawarSaam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेत बारामतीत करामत करत शरद पवारांनी अजित पवारांना शह दिला. त्यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा बारामती विधानसभेकडे वळवलाय. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांना सोबत घेत बारामतीचा दौरा सुरु केलाय. त्यामुळे अजितदादांचं टेंशन वाढल्याची चर्चा आहे.

शरद पवारांनी आधी बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यात दुष्काळ दौरा करून आधीच वातावरण तापवलंय. तब्बल 35 वर्षांनंतर शरद पवार बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. शरद पवारांनी बारामतीतून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. पण त्यानंतर त्यांनी बारामतीची धुरा अजित पवारांच्या खांद्यावर दिली होती. त्यामुळे बारामती तालुक्यात त्यांनी प्रत्यक्ष लक्ष घातलं नव्हतं. मात्र आता पवार दुष्काळी दौ-याच्या निमित्तानं मैदानात उतरले आहेत.

काकांचा दुष्काळी दौरा, दादांना टेंशन? बारामती पिंजून काढण्यासाठी पवार मैदानात
VIDEO: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा रोडमॅप तयार, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन

शरद पवारांचं बारामतीत ठाण

  • 18 जूनला दुपारनंतर शरद पवार निंबूत, वडगाव, करंजफूल आणि माळेगाव या गावांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

  • 19 जूनला गोविंदबागेतून शरद पवार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यामध्ये सांगवी,खांडज,निरावागज, डोरलेवाडी,काटेवाडी आणि पिंपळी गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

  • 20 जून रोजी पांढरी,लोणी भापकर आणि मोरगाव गावांना भेटी देत शरद पवार पुण्यात मुक्कामी असतील.

पवारांनी लोकसभेला बारामतीसह राज्यभर पायाला भिंगरी लावून प्रचार केला. त्यानंतर आधी दुष्काळी दौरा आणि आता बारामती मतदारसंघात ठाण मांडून नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका शरद पवारांनी लावलाय. बारामती लोकसभा जिंकली असली तरी विधानसभेचा गड भेदणं तेवढं सोप नसल्याचं बोललं जातंय.

काकांचा दुष्काळी दौरा, दादांना टेंशन? बारामती पिंजून काढण्यासाठी पवार मैदानात
VIDEO: महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडणार? अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

थेट बारामतीवर लक्ष केंद्रीत करून शरद पवार अजित पवारांकडे असलेली बारामती विधानसभाही खेचून आणतात की लोकसभेला हारलेली बाजी पलटवून पुतण्या काकांना शह देणार याची उत्सुकता आहे. मात्र पवार दुष्काळी दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेच्या मतांची पेरणी करत असल्याची चर्चा रंगलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com