VIDEO: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा रोडमॅप तयार, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन

Devendra Fadnavis News: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला रोडमॅप तयार केला आहे. याचबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा रोडमॅप तयार, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन
Devendra Fadnavis and Piyush GoyalSaam Tv

आज दिल्लीत भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. भाजोच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची काय रणनीती असणार आहे, याबाबत माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा रोडमॅप काय असेल, यावर बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी बोलताना पीयूष गोयल म्हणालेत आहेत की, महाराष्ट्रात कुठलाही महत्त्वाचा बदल होणार नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा रोडमॅप तयार, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन
VIDEO: महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडणार? अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपच्या महाराष्ट्र कोअर ग्रुप ची बैठक केंद्रीय नेतृत्वासोबत झाली, लोकसभेच्या निकालावर सविस्तर चर्चा झाली. यासोबतच मिळालेल्या मतांवर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले, महायुतीच्या घटक पक्षांसोबत विधानसभा लढणार असून निवडून येण्यासाठी रोडमॅप तयार केला आहे. घटक पक्षाला सोबत घेऊन आगामी विधानसभा कशी लढता, येईल यावर बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय भाजप नेतृत्व आमच्यासोबत उभं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा रोडमॅप तयार, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन
VIDEO: शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील जनतेपेक्षाही गोव्यातील जनतेच्या लाभाचा, नलावडे समितीचे निष्कर्ष काय?

दरम्यान, अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. याचबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं सांगण्यात आलं होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यात कुठलाही बदल होणार नाही, हे कोअर कमिटीच्या बैठकीत स्पष्ट झालं असल्याचं, सूत्रांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com