VIDEO: नॅरेटीव्हवरून आरोपांच्या फैरी; आधी देवेंद्र फडणवीस बोलले, नंतर उद्धव ठाकरे यांनी दिलं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray: नॅरेटीव्हवरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत.
नॅरेटीव्हवरून आरोपांच्या फैरी; आधी देवेंद्र फडणवीस बोलले, नंतर उद्धव ठाकरे यांनी दिलं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis Vs Uddhav ThackeraySaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. विरोधकांनी नॅरेटीव्ह सेट केला. त्यांनी अपप्रचार केला. संविधान बदलणं आणि मराठा आरक्षणाविषयी अपप्रचार केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती.

त्याला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. तुमचं मंगळसूत्र चोरुन नेणार, तुमची जनावरं घेऊन जाणार, हे काय काय खरं नॅरेटीव्ह होतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

नॅरेटीव्हवरून आरोपांच्या फैरी; आधी देवेंद्र फडणवीस बोलले, नंतर उद्धव ठाकरे यांनी दिलं प्रत्युत्तर
VIDEO: मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन? आमदारांना सूचना, आदेश आणि अलर्ट

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ''जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षाची होती, तशी काही प्रमाणात नॅरेटिव्हशी लढाई, ही आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली. ज्यामध्ये संविधान बदलणार, असा जो एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता. तो नॅरेटिव्ह निश्चितपणे ज्याप्रमाणात थांबवता यायला पाहिजे होता, त्याप्रमाणात आम्ही थांबू शकतो नाही.''

नॅरेटीव्हवरून आरोपांच्या फैरी; आधी देवेंद्र फडणवीस बोलले, नंतर उद्धव ठाकरे यांनी दिलं प्रत्युत्तर
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेलच्या किंमती वाढणार? कर्नाटकात इंधनाच्या दरात 3 रुपयांनी वाढ

देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी काय दिलं प्रत्युत्तर?

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, मंगळसूत्र चोरून नेणार, तुमच्या घरातील नळ, वीज कापतील, हे खरं नॅरेटिव्ह होतं का? तुमची म्हैस चोरून घेतील, हा खरेपणा होता का? नकली सरकार, नकली सेना, हे खरं नॅरेटिव्ह होतं का? मी (मोदी सरकार) प्रत्येकाला घर देईल, हे खरं नॅरेटिव्ह होतं का?, असे प्रश्न आता उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com