VIDEO: महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडणार? अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Ajit Pawar Group News: अजित पावर यांना टार्गेट कराल तर आम्हाला वेळा विचार करावा लागेल, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडणार? अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Amol MitkariSaam Tv

महायुतीत अजित पवार ओझे झाले आहेत का? अशी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पावर यांना टार्गेट कराल तर आम्हाला वेळा विचार करावा लागेल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

अजित पवार गटामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला, अशी चर्चा सुरू असतानाच अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यामुळेच महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडणार? अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
VIDEO: 'आरक्षण हिसकावण्यात आयुष्य गेलं, मराठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार' ,जरांगे भुजबळांवर पुन्हा कडाडले

काय म्हणाले अमोल मिटकरी?

अमोल मिटकरी म्हणाले आहेत की, ''अनेक माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी जे विश्लेषण केलं, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला आहे. भाजपचा सुद्धा फायदा झाला आहे, असं सांगण्यात आलं आहे. मात्र जाणीवपूर्वक दादांना (अजित पवार) टार्गेट करता असाल तर, निश्चितपणे आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल.''

महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडणार? अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
VIDEO: काकांचा दुष्काळी दौरा, दादांना टेंशन? बारामती पिंजून काढण्यासाठी पवार मैदानात

'विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू, अजित पवार अजित पवार गट नकाे'

दरम्यान, आज माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नाही, असं म्हणत भाजपच्या शिष्टमंडळाने पश्चिम संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे एक अहवाल दिला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर कारवाई व्हावी तसेच आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे निलंबन करावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने या अहवालाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढू, अजित पवार अजित पवार गट नकाे, अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com