Husband Attacks Wife  Saam Tv
क्राईम

Shocking: लग्नाच्या पहिल्याच रात्री भयंकर घडलं, शरीरसंबंधाला बायकोचा नकार; संतापलेल्या नवऱ्याने डोक्यात हातोडा घातला अन्...

Husband Attacks Wife: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने बायकोची हत्या करण्याचा प्रयत्न केला. शरीरसंबंधाला बायकोने नकार दिल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने बायकोवर हतोड्याने वार केले.

Priya More

Summary -

  • लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून बायकोवर जीवघेणा हल्ला

  • शारीरिक संबंधाला नकार दिल्याने नवऱ्याचा बायकोवर हातोड्याने हल्ला

  • पीडित महिला गंभीर जखमी झाली

  • ही घटना चेन्नईतील पुरशैवक्कम परिसरात घडली

लग्नाच्या पहिल्याच रात्री तरुणाने आपल्या बायकोची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने बायकोकडे शरीरसंबध ठेवण्याची मागणी केली. पण तिने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने बायकोच्या डोक्यात हातोडा टाकून तिला मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरशैवक्कममधील पार्थसारथी स्ट्रीट येथील रहिवासी ऑगस्टीन जोशुआने तिरुवल्लूर येथील २४ वर्षीय तरुणीसोबत लग्न केले. या दोघांचे लग्न एका मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे ठरले होते. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर हा तरुण आपल्या बायकोला घरी घेऊन आला. तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर दोघेही झोपण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेले.

झोपण्याच्या पूर्वी जोशुआने त्याच्या बायकोकडे शरीरसंबंधाची मागणी केली. पण तिने शरीरसंबंधाला नकार दिला. त्याच्या बायकोचे म्हणणे होते की आपले अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे एक-दोन दिवस आपण एकमेकांना समजून घेऊ. पण तरुणाला पहिल्याच रात्री शरीरसंबंध ठेवायचे होते. तिने शरीरसंबंध ठेवायला नकार दिल्याने तरुण संतप्त झाला. तो चिडून खोलीच्या बाहेर गेला आणि हातोडा घेऊन आला. त्याने हातोड्याने बायकोवर हल्ला केला. जास्त रक्तस्राव होत असल्याने त्याला वाटले बायको मेली. त्यामुळे तो घरातून पळून गेला.

सकाळी घरातील सर्वजण उठल्यानंतर त्यांना पीडित महिला जखमी आणि बेशुद्धावस्थेत दिसली. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या घटनेत महिला बचावली. आरोपीचे लग्नापूर्वीच काही महिलांशी प्रेमसंबंध होते. याची माहिती पीडित महिलेला कळाली. त्यानंतर तिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेची सध्या चेन्नईत चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT