Crime News: मिठीत घेत कपाळाचं चुंबन घेतलं, नंतर गळ्यावर फिरवला चाकू; नववधूला प्रियकरानेच संपवलं

Lover Kills Newly Married Woman: गोरखपूरमध्ये एका नवविवाहित महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली आहे. लग्न झाल्यानंतरही तरुणीने तरुणावर लग्न करण्याचा दबाव टाकत होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Lover Kills Newly Married Woman
Gorakhpur crime case: Police arrest lover for murdering a newly married woman in Rasoolpur village.saam tv
Published On
Summary
  • नवविवाहित महिलेची तिच्याच प्रियकराकडून हत्या

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाचा पर्दाफाश केलाय.

  • तरुणी आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकत होती.

एका प्रियकराने आपल्या नवविवाहित प्रेयसीचा गळा चिरून खून केल्याची घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील गोरखपुर जिल्ह्यातील रसूलपूर गावात ही धक्कादायक घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. प्रेयसीची हत्या करण्यापूर्वी आरोपीने तिला आधी मिठी मारली नंतर चुंबन घेत तिचा गळा चिरला. पोलिासंनी दिलेल्या माहितीनुसार, विनय निषाद उर्फ दीपक असं आरोपीचं नाव आहे.

सहा महिन्यांपूर्वी देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर येथे मृत महिलेचा विवाह झाला होता. ही महिला २१ डिसेंबर रोजी आपली चुलत बहिणीच्या लग्नासाठी माहेरी आली होती. त्यावेळी आरोपी विनय तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. पण नकार मिळत असल्यानं त्याने तिचा खून केला. एसपी नॉर्थ ज्ञानेंद्र प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ वाजता नववधूचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या, तसेच तिची बोटेही कापलेली होती.

Lover Kills Newly Married Woman
Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील पंचनामा करत तपास सुरू केला. आरोपी विनय आणि मृत तरुणी हे एकमेकांशी बोलायचे, अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली. पोलिसांनी संशयाच्या आधारावर सीडीआर तपासला. त्यात दोघांमध्ये सतत संपर्क असल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी विनय निषादला अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.

Lover Kills Newly Married Woman
Scam: शेअर मार्केटमध्ये ‘पैसा डबल’ होण्याच्या आशेनं गमावले ५ लाख, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

विनय निषादने पोलिसांना सांगितलं की, त्याची प्रेयसी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्या दोघांचा मृत तरुणीच्या लग्ना आधीपासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांचे तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण होतं. पण तरुणी विनयवर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने तिला संपवण्याचा मार्ग निवडला.

अशी केली हत्या

लग्नाच्या दिवशी तरुणीच्या घरी नव्हते. त्यावेळी विनय तिच्या घरापासून २०० मीटर दूर असलेल्या बागेत गेला. सुमारे चार तास बागेत ते दोघे बसून होते. त्यावेळी प्रेयसीने 'आता आपण परत सासरी जाणार नाही, तू माझ्याशी लग्न कर' असा हट्ट धरला. त्यावेळी विनयने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही.

त्यावेळी विनयने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला मिठी मारली. त्याच क्षणी तिच्या मानेवर वार केला," असे विनयने कबूल केले. गळा चिरल्यावर तरुणीने शस्त्राला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांच्याही बोटांना जखमा झाल्या. "तरुणी पूर्णपणे मरेपर्यंत विनये तेथेच बसून राहिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com