Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...

Nashik Neha Pawar : नाशिकमध्ये नवविवाहित महिलेनं सासरकडून मानसिक छळ व पतीच्या बाहेरील संबंधांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप केले असून पोलीस तपास सुरू आहे.
Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...
Nashik NewsSaam Tv
Published On
Summary
  • नाशिकमध्ये नवविवाहित महिलेची आत्महत्या

  • ६ पानांच्या सुसाईड नोटमध्ये मानसिक छळाचे आरोप

  • पतीचे बाहेरील प्रेमसंबंध असल्याचेही उल्लेख

  • पोलिस तपास सुरू

नाशिकमधील एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेने ६ पानांची सुसाईड नोट लिहून आयुष्याचा दोर कापला. या सुसाईड नोटमध्ये सासरच्या मंडळींनी दिलेला मानसिक त्रास, नवऱ्याचे बाहेरील प्रेम संबंध या सगळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव नेहा संतोष पवार (वर्षे २७) ( Neha Pawar ) असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास नेहाने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. यानंतर ही बाब मृत महिलेच्या पतीच्या लक्षात येताच त्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित करून पोलिसांना कळवले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता, पोलिसांना नेहाच्या राहत्या घरातून तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळली.

Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...
Pune : पुण्यात उद्यापासून वाहतुकीत मोठे बदल, कात्रज बायपासवरून जाण्याआधी ही बातमी वाचाच, अन्यथा होईल कडक कारवाई

नेहाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, " माझे नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार असून, माझे लग्न ४ जून २०२५ रोजी रेशीमबंध बँक्वेट हॉलमध्ये झाले. १० मार्चला सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी माझ्या सासरच्या मंडळींनी म्हटले की, हुंडाप्रथा बंद आहे. तरी तुम्ही नवरदेवाला त्याच्या अटी-शर्तीनुसार सोने, चांदी, पाच भांडे द्या. त्यानुसार माझ्या माहेरच्यांनी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. लग्नानंतर सासरचे भांडण करीत नाही पण, मानसिक त्रास देतात.’ असे तिने म्हटले आहे.

Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...
Hingoli : हृदयद्रावक! बायकोने रागात विहिरीत उडी मारली, वाचवायला गेलेला नवराही बुडाला, दोघांचाही मृत्यू

पुढे ती म्हणाली आहे की," सासरची मंडळी मला मोबाइलवर सारखी बोलते, घरकाम येत नाही, पतीला उलटसुलट सांगते सिलिंडर टाकी एक महिन्यातच संपते असे म्हणत सतत मानसिक त्रास द्यायचे. याशिवाय माझ्या पतीचे लग्नाआधीपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध असून, पतीने तिला दोघांचे अश्लील फोटो दाखवले होते. सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि सासरचे लोक पैशांची मागणी करू लागल्याने माहेरहून २० हजार रुपये आणून दिले. दिवाळीसाठी १५ दिवस माहेरी पाठवले. मात्र, दहाव्या दिवशी सासू व पतीने सासरी येण्यास सांगितले. नियमित मासिक पाळी येत नसल्याने सासरच्या लोकांनी त्रास दिला. सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून सगळ्यांना पाठवत आहे. माझे नशीब खराब असून, मला सासर चांगले मिळाले नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे’, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.

Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...
Delhi Bomb Blast : तोतया आयएएसच्या प्रकरणात संशयाचे नवे धागे, दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय

दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच नाशिक मध्ये घडलेला हा प्रकार मनस्ताप देणारा ठरला आहे. शिवाय अशा कित्येक वैष्णवींचा किंवा नेहांचा सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून जीव जाणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. नेहाने केलेल्या आरोपांनंतर तिच्या सासरच्या मंडळींवर कारवाई होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com