Pune : पुण्यात उद्यापासून वाहतुकीत मोठे बदल, कात्रज बायपासवरून जाण्याआधी ही बातमी वाचाच, अन्यथा होईल कडक कारवाई

Pune Navale Bridge News : पुण्यातील नवले पुलावरील भीषण अपघातानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली असून २५ नोव्हेंबरपासून सर्व वाहनांसाठी वेगमर्यादा ३० किमी प्रतितास लागू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही आणि स्पीड गनद्वारे कारवाई केली जाणार आहे.
Pune : पुण्यात उद्यापासून वाहतुकीत मोठे बदल, कात्रज बायपासवरून जाण्याआधी ही बातमी वाचाच, अन्यथा होईल कडक कारवाई
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • नवले पुलावर ३० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

  • सीसीटीव्ही आणि स्पीड गनद्वारे देखरेख सुरू

  • अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रशासनाचे पाऊल

पुण्यातील नवले पुलावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने या पुलाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येणार आहे. येत्या २५ नोव्हेंबर पासून सर्व वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा निश्चित केली जाणार आहे. शिवाय या मर्यादांचे पालन न केल्यास त्या चालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे - मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावर होणाऱ्या वाढत्या अपघातांची क्रमवारी लक्षात घेता, तसेच वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.

Pune : पुण्यात उद्यापासून वाहतुकीत मोठे बदल, कात्रज बायपासवरून जाण्याआधी ही बातमी वाचाच, अन्यथा होईल कडक कारवाई
Maharashtra Politics : घराणेशाहीला ब्रेक! अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात, भाजपाचा धडाकेबाज निर्णय

यापूर्वी फक्त नवले पुलावर वेगमर्यादा ठरवण्यात आली होती. आता भूमकर चौक ते नवले ब्रीजपर्यंत ही वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे. हा नवीन आदेश दिनांक २५/११/२०२५ पासून लागू करण्यात येत आहे. या नव्या वेगमर्यादेमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र या नव्या वेगमर्यादेमुळे वाहतुक कोंडी होण्याचीही शक्यता आहे.

Pune : पुण्यात उद्यापासून वाहतुकीत मोठे बदल, कात्रज बायपासवरून जाण्याआधी ही बातमी वाचाच, अन्यथा होईल कडक कारवाई
Heavy Rain Alert : राज्यात थंडी ओसरली, 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार, वाचा हवामान विभागाचा इशारा

नवले पुलावर तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग आपोआप वाढतो. तीव्र उतार असल्याने अनेक वाहन चालक गाडी न्युट्रल करतात आणि त्यानंतर उतारामुळे पुन्हा नियंत्रण मिळवणे अवघड होते. आता वेगमर्यादा ठरवल्याने वाहन चालकांनी नियमांचे कठोर पालन करावे असं आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न केल्यास सीसीटीव्ही, स्पीड गनने लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान नियम बदलल्या नंतर तरी या पुलावरील अपघाताचे प्रमाण कमी होणार का? आणि मृत्यूचा सापळा बनलेला नवले पूला चा टॅग पुसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com