Hyderabad Terror Threat: 26/11 सारख्या हल्ल्याचा कट,300 जण टार्गेटवर; धमकीच्या पत्राने हैदराबाद हादरलं! पोलिसांचा हाय अलर्ट

Hyderabad Terror Threat: लश्कर-ए-तैयबाच्या नावाने एक धमकीचे पत्र हैदराबादमधील पोलीस आयुक्तांना मिळालंय. यात २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला करण्याची इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
Hyderabad Terror Threat
Hyderabad on high alert after alleged 26/11-style terror attack threatsaam tv
Published On: 
Summary
  • हैदराबादमध्ये 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याची धमकी

  • हैदराबादमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या नावाने धमकीचे पत्र

  • हैदराबादमध्ये दोन बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

'लष्कर-ए-तैयबा' या दहशतवादी संघटनेच्या नावाने एक धमकीचे पत्र मिळाल्यानंतर हैदराबाद पोलीस हाय अलर्टवर आलेत. या धमकीच्या पत्रात शहरात दोन बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. किमान ३०० लोकांचा बळी घेण्याचा कट रचला गेलाय. तसेच, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती केली जाईल. त्याच तारखेला हैदराबादमध्ये हल्ला केला जाईल, अशी धमकी देण्यात आलीय.

या पत्रात या कथित कटाचे वर्णन दक्षिण काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लतीफ भट याच्या मृत्यूचा बदला घेऊ. लतीफ भट १८ नोव्हेंबर रोजी कुलगाममधील जंगलपोरा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता.

Hyderabad Terror Threat
Transfer News : पोलिस दलात मोठा फेरबदल; १४४ पीपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

बॉम्बस्फोट आणि २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी

हैदराबाद शहर पोलीस दलाच्या सहपोलीस आयुक्तांनी (विशेष शाखा) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका अधिकृत पत्रात या धमकीचा तपशील देण्यात आलाय. या पत्रानुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने शहरात दोन बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. त्यांचे उद्दिष्ट किमान ३०० लोकांना लक्ष्य करण्याचे आहे. यासह त्याच तारखेला हैदराबादमध्ये दहशत पसरवण्याची धमकीही देण्यात आलीय.

पत्रात दिलेल्या माहितीनुसार, ही धमकी दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या 'लष्कर-ए-तैयबा'चा दहशतवादी लतीफ भट याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी देण्यात आलीय. १८ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील जंगलपोरा भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लतीफ भट मारला गेला होता. पत्रात त्याला 'लष्कर'चा दहशतवादी म्हणून संबोधले आहे. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Hyderabad Terror Threat
बारामतीत गोळीबाराचा थरार! आलिशान कारमधून आलेल्या उद्योजकावर धडाधड गोळ्या झाडल्या

एका धमकीवजा पत्रामुळे हैदराबाद पोलीस प्रशासन सतर्क झालेत. शहरातील गर्दीची सार्वजनिक ठिकाणे यात काचेगुडा येथील 'हॉटेल टुरिस्ट प्लाझा' आणि काचेगुडा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. तसेच इतर हॉटेल्स, रेल्वे व बस स्थानके, धार्मिक स्थळे आणि इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या आणि पाळत ठेवण्याची यंत्रणा बळकट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.